किनवट नगर परिषद प्रशासकीय इमारतीत 6 टेबलवर 5 फेऱ्यात होणार मतमोजणी ; प्रशासन सज्ज -निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, December 20, 2025

किनवट नगर परिषद प्रशासकीय इमारतीत 6 टेबलवर 5 फेऱ्यात होणार मतमोजणी ; प्रशासन सज्ज -निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर

 



किनवट : रविवारी (ता.21 डिसेंबर 2025) सकाळी 10 वाजता पासून किनवट नगर परिषद प्रशासकीय इमारतीत पहिल्या मजल्यावर उभारलेल्या मतमोजणी कक्षात  किनवट नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ची मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार असून 6 टेबलवर 5 फेऱ्यात मतमोजणीसाठी प्रशासनाने  सर्व प्रकारे तयारी केली आहे. असे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर यांनी कळविले आहे.

      10 प्रभागातून एक अध्यक्ष व 21 सदस्य निवडून देण्यासाठी मंगळवारी (ता. 2 डिसेंबर) मतदान घेण्यात आले होते. 29 मतदान केंद्रावर पुरुष 12334 पैकी 9438 , स्त्री 13256 पैकी 9568 व  ईतर 03 पैकी 2 असे एकूण  25593 पैकी 19008 मतदारांनी (74 . 27 टक्के) मतदानाचा हक्क बजावला होता. अध्यक्षपदासाठी 8 व सदस्यपदांसाठीच्या 90 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात नोंदवले होते. ही मतदान यंत्रे किनवट नगर परिषदेच्या पहिल्या मजल्यावरील स्ट्राँगरूममध्ये सशस्त्र पोलिस बंदोबस्तात सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत ठेवण्यात आली होती.

     पहिल्या टप्प्यातील निवडणूक कार्यक्रमान्वये नियोजित असलेली 3 डिसेंबरची मतमोजणीची तारीख मा. न्यायालयाच्या आदेशानुसार पुढे ढकलण्यात येऊन सुधारित निवडणूक कार्यक्रमांतर्गत नियोजित असलेल्या मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच रविवारी (ता. 21 डिसेंबर 2025) सकाळी 10 वाजेपासून घेणेबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना निर्देशित करण्यात आले होते. त्यानुसार किनवट नगर परिषद सावित्रिक  निवडणूकीची मतमोजणी होणार आहे. याकरिता 6 टेबल ठेवण्यात आले असून 5 फेऱ्या होणार आहेत. प्रत्येक टेबलवर 1 मतमोजणी पर्यवेक्षक , 1 मतमोजणी सहायक व 1 शिपाई राहणार आहे.

     मतमोजणी परिसरात चोख पोलिस बंदोबस्त राहणार असल्याने उमेदवार , निवडणूक प्रतिनिधी व टेबलनिहाय एका उमेदाराच्या एका मतमोजणी प्रतिनिधीस मतमोजणी कक्षात प्रवेशाची अनुमती राहणार आहे.  त्यांना देण्यात आलेल्या ओळखपत्र पासेस द्वारेच प्रवेश दिला जाणार आहे. मोबाईल अथवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस सोबत आणण्यास परवानगी नाही. एका फेरीत दोन प्रभागाची मतमोजणी होणार आहे. ह्यावेळी त्याच प्रभागाचे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांनाच बाहेरील मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जाईल.पहिली फेरी सकाळी 10 वाजता सुरू होणार असल्याने प्रभाग एकशी संबंधितांना सकाळी 9 वाजता प्रवेश देण्यात येईल. ही मतमोजणी प्रक्रिया कायदा व सुव्यवस्था राखून शांततेत पार पाडण्यासाठी सर्व जनतेंनी प्रशासनास सहकार्य करावे , असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर यांनी केले आहे.

     निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी विवेक कांदे, नायब तहसिलदार तथा अतिरिक्त सहायक निवडणूक चंद्रशेखर सहारे, नायब तहसीलदार म. रफिक म. बशीरोद्दीन, नायब तहसीलदार बालाजी फोले, निलेश राठोड, मीडिया नोडल अधिकारी तथा मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे व मल्लिकार्जून स्वामी आदिंसह अधिकारी-कर्मचारी ही मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कटाक्षाने कार्यरत आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News