पवित्र पोर्टल अंतर्गत शिक्षकपदी निवड झालेल्या आदिवासी लेकरांचा सत्कार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, September 2, 2026

पवित्र पोर्टल अंतर्गत शिक्षकपदी निवड झालेल्या आदिवासी लेकरांचा सत्कार

 



किनवट : पवित्र पोर्टल अंतर्गत शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचे पवित्र कार्य करण्यासाठी  शिक्षक पदी निवड झालेल्या आदिवासी लेकरांचा सत्कार नुकताच करण्यात आला.

     तालुक्यातील क्रांतीसूर्य बिरसा मुंडा सेवाभावी संस्था पिपंळगांव (सि ) या संस्थेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी समाजाचे नेते आदिवासी सेवक नारायणराव सिडाम होते ; तर  प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख विजय मडावी, रामदास मेश्राम, गोवर्धन मेश्राम, बाबुलाल चौधरी उपस्थित होते. 

     पवित्र पोर्टल अंतर्गत गंगाधर उईके यांची इंग्रजी विषयासाठी तर शुभांगी कनाके यांची फिजिक्स विषयासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल, किरण डोंगरे यांची विज्ञान विषयासाठी माध्यमिक शिक्षक म्हणून तर कल्पना सिडाम यांची उच्च प्राथमिक विषय शिक्षक, बालाजी गेडाम यांची प्राथमिक शिक्षक म्हणून निवड झाल्या बद्दल संस्थेच्या वतीने  आदिवासी गमछा, पुष्पहार अन् हिरासुका लिंगो यांची प्रतिमा भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

     यावेळी नारायण सिडाम, रामदास मेश्राम, विजय मडावी, शिक्षक दौडीवार यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या अध्यक्षा जया गोपाल कनाके यांनी नवनियुक्त सर्व शिक्षक बांधवाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या वेळी ज्ञानेश्वर सिडाम, नितीन कनाके, रामेश्वर चांदेकर, हर्षद कनाके, संतोष कनाके, संदीप कनाके, तलाठी विक्रम चौधरी, विवेक सलाम आदी समाज बांधव उपस्थित होते. 

     आदिवासी समाजाचे दैवत हिरासुका लिंगो यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. या कार्यक्रमाचे प्रास्तविक गोपाल देवकामाई रामदास कनाके यांनी व  सूत्रसंचालन कविराज कोवे यांनी केले. बालाजी कनाके यांनी आभार मानले.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News