किनवट : “लोककला ही केवळ मनोरंजनाची साधना नसून, ती समाजाच्या संस्कृतीची, परंपरेची आणि लोकजीवनाच्या अस्मितेची जिवंत ओळख आहे.” या भावनेला साकारत पारंपरिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ (महाराष्ट्र राज्य), तालुका शाखा किनवटच्या वतीने आयोजित ‘लोककलावंतांचा जागर’ नुकताच कलावती गार्डन, किनवट येथे उत्साहपूर्ण आणि कलामय वातावरणात संपन्न झाला.
या मेळाव्यात आदिवासी भिल्ल नृत्य, ढेमसा नृत्य , बंजारा लेंगी नृत्य, गोंधळ, वासुदेव, भारूड, लोकगीते, प्रबोधन गीते आदी विविध पारंपरिक लोककलांचे बहारदार सादरीकरण करण्यात आले. ढोल-ताशांचा निनाद, लोकगीतांची सुरावट, भारूडातील सामाजिक संदेश आणि पारंपरिक नृत्यांच्या तालावर उपस्थित रसिक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.
“ज्या मातीने संस्कृती घडवली, त्या मातीची भाषा म्हणजे लोककला; आणि लोककलावंत हे त्या संस्कृतीचे जिवंत शिलेदार आहेत.” या विचाराची प्रचिती संपूर्ण कार्यक्रमातून आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अभियंता प्रशांत ठमके होते. अमेरिकेतील कॉग्निझंट कंपनीचे सहसंचालक अभियंता सुधीर ढवळे, सुलेखा ढवळे, सिनेअभिनेते सुशांत प्रशांत ठमके, सिनेमॅटोग्राफर रुद्र पवार आणि तेलगू अभिनेते प्रणव चिंटापटलावार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली.
यावेळी सिनेअभिनेते डॉ. प्रमोद अंबाळकर तसेच पारंपरिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ (महाराष्ट्र राज्य) चे संस्थापक त्रिरत्नकुमार मा. भवरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात प्राचार्य शुभांगीताई ठमके आणि उपप्राचार्य डॉ. पंजाब शेरे यांनी लोककलेचे सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक महत्त्व विशद केले.
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष युवा नेते करणभाऊ एंड्रलवार यांनी ग्रंथभेट व सन्मानचिन्ह देऊन सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमांचे प्रास्ताविक आयोजक तथा तालुकाध्यक्ष दिलीप गंगाराम मुनेश्वर यांनी केले, तर संयोजक विवेक मारोतराव ओंकार यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी आणि ओघवते सूत्रसंचालन निवेदक उत्तम कानिंदे यांनी केले. याप्रसंगी प्रसिद्ध गायिका आम्रपाली वाठोरे यांनी स्वागत गीत , प्राचार्य सुरेश पाटील यांनी वामनदादांचं गीत व गायीका सुनिता कीर्तन यांनी प्रबोधन गीत गायिले .
यावेळी माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेम्माणीवार, आदिवासी सेवक नारायणराव सिडाम, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष दादाराव कयापाक, सामाजिक कार्यकर्ते संदीपभाऊ केंद्रे ,गायक आनंद कीर्तने, प्रा. डॉ. सुनिल व्यवहारे, संदीप केंद्रे, नगरसेवक अभय महाजन, शेखर नेम्माणीवार, प्रशांत कोरडे , गंगुबाई परेकार, पारंपरिक शाहीर लोककला संवर्धन मंडळाचे प्रदेशाध्यक्ष रमेश गार्लेवाड, शाहीर बापूराव जमदाडे, महिला मराठवाडा अध्यक्ष तथा गायिका सुनिता कीर्तने, शाहीर शंकरदादा गायकवाड, जिल्हाध्यक्ष अंकुश चित्ते, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश कदम, जिल्हा सचिव शाहीर सुभाष गुंडेकर, वाशीम जिल्हाध्यक्ष सोनाली शरद खडसे, ह.भ.प. बालाजी पांचाळ, नांदेड तालुकाध्यक्ष बेबीताई आठवले, शाहीर किसन मंत्री, शाहीर शिवाजी डोखळे, गौतम राऊत, तेजाब पाईकराव, शाहीर शेषराव चव्हाण, पत्रकार गोकुळ भवरे, ऍड . मिर्लिद सर्पे, रविराज कानिंदे , संतोष शिसले , किशन परेकार, कामराज माडपेल्लीवार, स. इम्रानअली, विशाल हलवले, विजय वाघमारे, अशोक वासाटे, किशनराव ठमके, प्रकाश मुनेश्वर, जनार्धन भवरे, मधुकर मुनेश्वर ,महेंद्र नरवाडे, रुपेश मुनेश्वर, विजय वाघमारे, दत्ता गड्डलवाड, शंकर सोनकांबळे आणि अनिल तामगाडगे यांच्यासह अनेक मान्यवर व लोककलाप्रेमी उपस्थित होते.
लोककलेच्या संवर्धनासाठी कार्यकर्त्यांचे योगदान
या भव्य मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका उपाध्यक्ष गणेश शेवाळे, सचिव केशव केंद्रे, शाहीर दिलीप कोसले, मधुकर उमरे, संजय ठोके, बालाजी वाढवे, भीमराव पाटील, अनिल उमरे, राजेश धावारे, अशोक दवणे, गणपत वासाटे, पंकज भवरे, परसराम जाधव आणि हिरामण जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
“लोककला जिवंत राहिली तर संस्कृती जिवंत राहते;
आणि संस्कृती जिवंत राहिली तर समाजाची ओळख चिरंतन राहते.”
या विचाराने प्रेरित होऊन पारंपरिक लोककलेचे जतन, संवर्धन आणि पुढील पिढीपर्यंत तिचा वारसा पोहोचविण्याचा निर्धार या मेळाव्यातून व्यक्त करण्यात आला.
किनवटच्या मातीत पारंपरिक लोककलेचा जागर घडवून आणणारा हा मेळावा लोककलावंतांच्या कलागुणांना व्यासपीठ देणारा, नव्या पिढीला आपल्या सांस्कृतिक मुळांशी जोडणारा आणि लोककलेच्या संवर्धनाला नवी ऊर्जा देणारा अविस्मरणीय सोहळा ठरला.
















No comments:
Post a Comment