रोहिदास तांडा येथील 23 व्यक्तींवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल "जातीवाचक शिवीगाळ, मानसिक व शारीरिक छळ , हुंड्याची मागणी आली अंगलट " - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, September 4, 2026

रोहिदास तांडा येथील 23 व्यक्तींवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल "जातीवाचक शिवीगाळ, मानसिक व शारीरिक छळ , हुंड्याची मागणी आली अंगलट "


 किनवट (विशेष प्रतिनिधी पंडित धुप्पे) : तालुक्यातील रोहिदास तांडा येथील एकाच कुटुंबातील सदस्यांसह इतर एकूण 23 व्यक्तींवर ॲट्रॉसिटी व हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार किनवट पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

     याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी ही अनुसूचित जातीची असून आरोपी हे बिगर अनुसूचित जाती-जमातीचे आहेत. प्रभाकर व्‍यंकटी चव्हाण राहणार रोहिदास तांडा हे फिर्यादीचे शेतात ट्रॅक्टरने नांगरणी के लेल्या कामाचे पैसे मागण्यासाठी फिर्यादीच्या घरी गेला, फिर्यादी शिवाय दुसरे कोणीच घरी नसल्याने फिर्यादीने पुन्हा येण्यास सांगितले. यावेळी आरोपीने फिर्यादी कडून मोबाईल नंबर घेतला आणि मोबाईल संपर्कातून दोघांची ओळख झाली. दोघांमध्ये 2020 ला आंतरजातीय विवाह झाला. त्यानुसार ते दोघे नांदेड येथे राहावयास गेले. तेथे त्यांना एक अपत्य जन्माला आले. त्यानंतर दोघे रोहिदास तांडा येथील राहत्या घरी आले असता आरोपीचे आई, वडील, पहिली पत्नी, मुले, भाऊ व नातेवाईकांनी तू हलक्या जातीची आहेस असे हिणवून फिर्यादीला जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली व फिर्यादीचे सामान फेकून देण्यात आले.

     आरोपीने पहिले लग्न झाले व मुले असल्याची माहिती लपवून ठेवली होती. यानंतर समाजातील पंचामार्फत बैठका झाल्या. त्यानंतर सासरच्या लोकांकडून हुंड्यासाठी छळ करण्यात आला. त्यानंतर फिर्यादीने नांदेड येथील महिला सहाय्यक भरोसा सेल, आणि पोलीस स्टेशन किनवट येथे अन्याय झाल्याची तक्रार दिली. दिलेल्या फिर्यादी नुसार ॲट्रॉसिटी व इतर कलमानुसार 23 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. या आरोपीमध्ये प्रभाकर व्‍यंकटी चव्हाण, व्‍यंकटी रोहिदास चव्हाण, कमलाबाई व्‍यंकटी चव्हाण, आरोपीची पहिली पत्नी प्रतीक्षा प्रभाकर चव्हाण, मुले विजय प्रभाकर चव्हाण, अजय प्रभाकर चव्हाण, तसेच इतर नातेवाईक दिलीप व्‍यंकटी चव्हाण, कविता दिलीप चव्हाण, नामदेव रोहिदास चव्हाण, किसन रोहिदास चव्हाण, भगवान रोहिदास चव्हाण, बालाजी नामदेव चव्हाण, अरविंद विनायक चव्हाण, सुरेश मच्छीराम राठोड, शांताबाई नामदेव चव्हाण, साहेबराव चव्हाण हे सर्व राहणार रोहिदास तांडा ता. किनवट आणि शिरूर पवार राहणार वाघी , ता. किनवट, अनिल भगवान चव्हाण सिरमेटी, महेश रमेश कोमलवार रा. किनवट, संतोष कऱ्हाळे किनवट, बंडू सिंग राठोड व पुष्पाबाई बंडू सिंग राठोड रा. लिंगी या सर्वांवर ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये किनवट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी ता. 1 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 22: 39 वाजता गुन्हा दाखल केला. उप विभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर कदम हे तपासणी अधिकारी म्हणून पुढील तपास करतील.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News