किनवट ( संदीप दोराटे) :
किनवट तालुक्यातील नागझरी कॅम्प येथील रहिवासी शेतकरी दत्ता नामदेव भालेराव ( वय ४८ वर्षे ) यांचा बुधवारी ( २२ ) पहाटे सव्वाचार वाजता मृत्यू झाला.
मंगळवारी (ता. २१ ) दिवसभर ऊन्हात शेतात कडबा बांधून झाल्यावर ते घरी आले. उष्पतेच्या कहरमध्ये ४४ अंश सेल्सिअस तापमान होते. तेव्हा रात्री त्यांना उलट्या झाल्या. सकाळी सव्वाचार वाजता रेल्वेने त्यांना नांदेड येथे उपचारासाठी नेण्याकरिता किनवट रेल्वे स्थानकावर आणले होते. रेल्वे स्थानकावरच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. सायंकाळी ४ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे..
No comments:
Post a Comment