शाळाप्रवेश.. उत्सव झाला पाहिजे ! - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, June 13, 2019

शाळाप्रवेश.. उत्सव झाला पाहिजे !



            सुट्टी संपली, शाळा सुरु झाली.. शाळेचा पहिला दिवस आनंदाचा, उत्सवाचा.. प्रदिर्घ उन्हाळी सुटयानतंर आज शाळा.. सगळीकडे नवे नवे.. पहिल्या वर्गात येणाऱ्या मुलांना शाळा हवीहवीशी वाटणारी तर काहींना नकोशी वाटणारी.. पण शाळेच्या पहिल्या दिवसी शिक्षक फुलं आणि चॉकलेट देऊन जेव्हा स्वागत करतात.. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून शाळाही खळखळून हसत असेल नाही का ? निरागस बालक जेव्हा शाळेत प्रवेश करतात तेव्हा पहिल्याच दिवसी एखादा सण साजरा करतोय असं वाटावं असा शाळेचा परिसर.. हसतमुख शिक्षकांने केलेले स्वागत, गोडस मुलांना जवळ घेऊन  आस्थेने सवांद साधणारी शिक्षिका.. सगळ कसं वेगळं वाटावं असं.. मुलांना हे जग नवं वाटणारं असल तरी अशा प्रेममय स्वागतांने जग आपलसं वाटणार.. मग काय पहिल्याच दिवसी शाळेत मिळणारे नवे मित्र- मैत्रिणी.. गप्पागोष्टी, खेळ, किती किती मजा नाही का..?
             कुणाचे वर्ग बदलले, कुणाचे शिक्षक बदलले.. त्यांनाही पहिल्याच दिवसी वेगळं अनुभवायला मिळणार.. त्यांचाही आनंदाचा क्षण. आज शाळेचा पहिला दिवस.. उत्तीर्ण होऊन पुढील वर्गात प्रवेश घेतांना, नवीन वर्गखोलीत बसतांना मुलांना तर आनंदच !  नव्या वर्गात जागेवर बसण्याची धडपड, नव्या शिक्षकांना बोलतांनाचा आनंद.. खरच कशात मोजता येईल का ? नाही ना !  हा आनंद विद्यार्थी -त्यांचे शिक्षक - मुख्याध्यापक यांना नक्कीच जानवतो. सगळं काही नवीन असल्याने मुले भरभरून बोलण्याचा प्रयत्न करतात.. शाळेच्या पहिल्याच दिवसी त्यांच्या वर्गाची पाठ्यपुस्तके हातात पडतात. शैक्षणिक साहित्यही दिल्या जाते. मुलांच्या हाती पुस्तके पडताच त्यावर आपली नावे लिहून पुस्तके पाहण्यात गर्क झालेले विद्यार्थी मी पाहिले.. पुस्तके नवे, त्यातील चीत्र नवे, गणवेश नवा, शुज नवे.. काय मज्जा !  शाळेचा पहिला दिवस आनंद तर वाटणारच ना !
         
            आता तर शाळेचे रुपच बदलले.. सर्वच डिजीटल शाळा ! वर्गखोल्या रंगरंगोटीने परिपूर्ण.. शाळेच्या प्रवेशव्दारावर कमान त्यावर शाळेचे नाव, संरक्षक भिंतीवर पाठ्यपुस्तकातले चीत्र, मराठी- हिंदी - इंग्रजी शब्द, इतिहास, भूगोल व परिसराची माहिती, विज्ञानाचे प्रयोग, गणितीय सुत्र, पाढे.. जसं काय सर्व पुस्तके भिंतीवर अंथरलेली ! शाळेच्या प्रांगणात विविध प्रकारचे वृक्ष, विविध फुलांच्या वेली.. हिरवी अन मनमोहक परिसर असलेली शाळा आज सर्वत्र पाहायला मिळते.. याचे सर्व श्रेय शाळेचे विद्यार्थी, पालक -शिक्षक, शिक्षिका -मुख्याध्यापक- केंद्रप्रमुख, शिक्षणविस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी -शिक्षणाधिकारी यांना जाते. शाळेतच तक्रार पेटी, प्रयोगशाळा, वाचनालय, क्रीडा साहित्य, मधान्ह भोजन, पिण्याचे शुद्ध पाणी, मुला - मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह.. शालेय व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने शाळा नावारूपास येतांना दिसते.
           नवोपक्रमाने शाळा परिपूर्ण होतांना दिसत आहे. उपक्रमशिल शिक्षकामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागली आहे.. म्हणून विद्यार्थांना शाळा आवडू लागलीय! डिजीटल वर्गखोलीत काम्प्यूटर व प्रोजेक्टर व्दारे नवनवीन माहिती मिळू लागलीय. डिजीटल बोर्डमुळे विद्यार्थ्यांच्या मनावर पाठ्यपुस्तकातील मुद्दे सहज बिंबवता येतात. सहजपणे अध्ययन- अध्यापन होते. आनंददायी व हसत खेळत शिक्षणावर भर असल्याने मुलांनाही आनंद वाटतो व तो शाळेत टिकून राहतो. मुलींची उपस्थिती वाढवण्यासाठी भत्ता दिला जातो, आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्या जाते, मध्यान्ह भोजनात पौष्टिक आहार दिल्या जातो, मोफत पाठयपुस्तके, मोफत गणवेश, विविध शासकिय योजनांचा प्रत्येक मुलांपर्यत होणार लाभ.. शाळेत होणारे संस्कृतिक कार्यक्रम, विविध क्रीडा स्पर्धा, नैसर्गिक सहल, बीनभिंतीची शाळा, क्षेत्रभेट.. असे विविध उपक्रम राबविणारे कल्पक शिक्षक जिल्हा परिषद शाळेत पहावयास मिळतील!
             बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार शाळा प्रवेश उत्सव सर्व जिल्हयात साजरा होतोय. शाळा प्रवेश उत्सव राबवून १०० टक्के पटनोंदणी, १०० उपस्थिती, व १०० टक्के गुणवत्ता या उद्दीष्टाने काम होणार आहे. ६ ते १४ वयोगटातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हा मुख्य उद्देश आहे. पालकही जागरूक झालेले आहेत. मुलांना वयाच्या सहाव्या वर्षी शाळेत दाखल करतांना दिसतात. प्राथमिक शिक्षणासाठी जागरूक असल्याने शिक्षक आणि पालकात गुणवत्ता संदर्भात चर्चा होतांना दिसते, ही सकारात्मकताच यशाची पायरी आहे..!
- रमेश मुनेश्वर, किनवट
स्तंभलेखक तथा शिक्षक,    
     जि.प.प्रा.शा. लोणी
    भ्र. ७५८८४२४७३५

1 comment:

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News