जागतिक पर्यावरण दिन: नांदेड जिल्‍हा परिषदेत वृक्ष लागवड - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, June 6, 2019

जागतिक पर्यावरण दिन: नांदेड जिल्‍हा परिषदेत वृक्ष लागवड



वृक्षसंवर्धनासाठी नागरीकांनी पुढाकार घ्‍यावा- जि.प. अध्‍यक्षा शांताबाई जवळगावकर

 नांदेड ( मिलिंद व्यवहारे ) :
 पर्यावरण संवर्धनासाठी नागरीकांनी वृक्षांची लागवड करुन त्‍यांचे संवर्धन करण्‍यासाठी पुढाकार घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा शांताबाई पवार जवळगावकर यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्‍य साधून गुरुवारी (ता. 6 जून )  जिल्‍हा परिषद प्रांगणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्‍यात आला, त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्‍प संचालक नईम कुरेशी, जिल्‍हा परिषद सदस्‍य साहेबराव धनगे, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, एस.व्‍ही शिंगणे, उप मुख्‍य लेखा व वित्‍त अधिकारी शेखर कुलकर्णी, जिल्‍हा जलसंधारण अधिकारी व्‍ही.पी. शाहू, कार्यकारी अधियंता पी.एस. मुंडे, नरेगाच्‍या गट विकास अधिकारी एस.के. वानखेडे, गट विकास अधिकारी सुहास कारेगावे, कक्ष अधिकारी बालाजी पुजरवाड आदींची उपस्थिती होती.

     पुढे त्‍या म्‍हणाल्‍या, झाडा अभावी पर्जन्‍यमान दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. वातावरणातील तापमान कमी करण्‍यासाठी झाडे लावणे अत्‍यंत आवयक आहे. झाडं ही आपणांस आयुष्यभर फुकट ऑक्सिजन देत असतात याची कदर करुन तसेच भावी पिढीसाठी वृक्ष लागवड करुन त्‍याचे संवर्धन करावे असे आवाहन जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा शांताबाई पवार जवळगावर यांनी केले.

     यावेळी जिल्‍हा परिषद परिसरात वड, पिंपळ, चिंच, करंजी, निलगीरी, सिताफळ, लिंब आदी प्रकारची झाडे लावण्‍यात आली. याप्रसंगी विस्‍तार अधिकारी अशोक पावडे, अशोक मोकले, संतोष दासरवाड, बालाजी नागमवाड, पवन तलवारे, बालाजी अवर्दे, मिलिंद व्‍यवहारे, सुरेश इंदूरकर, डॉ. विलास ढवळे, डॉ. नंदलाल लोकडे, महेंद्र वाठोरे आदींची उपस्थिती होती.




ग्राम पंचायत निहाय तीन हजार वृक्ष लागवडीचे उदिष्‍ट- सिईओ अशोक काकडे


संपूर्ण जिल्‍हा हिरवागार करण्‍यासाठी जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने नियोजन करण्‍यात आले असून जिल्‍हयातील प्रत्‍येक ग्रामपंचायतीमधून सुमारे तीन हजार वृक्ष लागवडीचे उदिष्‍ट ठेवण्‍यात आल्‍याची माहिती जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी दिली आहे. मागच्‍या वर्षी या मोहिमेत जिल्‍हा परिषदे अंतर्गत 18 लाक्ष वृक्षांची लागवड करण्‍यात आली होती. आता चालू वर्षात प्रत्‍येक ग्रामपंचायतीमधून तीन हजार झाडे लावली जातील. यासाठी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, स्‍वयंसेवी संस्‍था, शालेय विद्यार्थी, जिल्‍हा परिषदे अंतर्गत सर्व कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, महिला बचत गट, युवक-युवती मंडळ, गावस्‍तरावरील सर्व समित्‍यांचे सदस्‍य आदींचा सहभाग घेण्‍यात येणार असल्‍याचे  अशोक काकडे यांनी सांगीतले.

1 comment:

  1. किती झाडे जगतात हे महत्वाचे

    ReplyDelete

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News