नांदेड : बेलानगर येथील ज्येष्ठ नागरिक ताराबाई निवृत्ती ढवळे यांचे शुक्रवारी (ता. 26 ) रात्री औरंगाबाद येथे एका खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्या 60 वर्षांच्या होत्या. भारतीय सैन्य दलातील सुभेदार निवृत्ती ढवळे यांच्या त्या अर्धांगिनी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनातील क्रांतीकारी शहीद गौतम वाघमारे यांच्या त्या ज्येष्ठ भगिनी होत. ताराबाई निवृत्ती ढवळे यांच्या मागे पती, 1 मुलगा, 3 मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. नांदेडच्या सामाजिक न्याय भवन विभागातील शशिकांत वाघमारे यांच्या त्या ज्येष्ठ भगिनी होत. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (ता. 27 जुलै ) दुपारी 12 वाजता नांदेडच्या गोवर्धन घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

No comments:
Post a Comment