वंचित बहूजन आघाडीचे पक्षनिरिक्षक राम गारकर यांचा नांदेडात सत्कार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, July 27, 2019

वंचित बहूजन आघाडीचे पक्षनिरिक्षक राम गारकर यांचा नांदेडात सत्कार


नांदेड : शनिवारी ( ता.  27 ) स्मृतिशेष बाबुराव निलंगेकर विद्यासंकूल लालवाडी  येथे भारिप - बहुजन महासंघ युवा आघाडी समन्वय समितिच्या वतीने वंचित बहूजन आघाडी नांदेडचे पक्ष निरिक्षक राम गारकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
           यावेळी युवा आघाडीच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करून सत्काराला उत्तर देतांना रामगारकर म्हणाले की, येणा-या विधानसभा निवडणूकीत खुप मेहनत घेऊन श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर आपल्याला बसवायचे आहे ; याकरिता युवा आघाडीला महत्वाची भमिका बजावावी लागणार आहे.आपापसातील मतभेद विसरून पक्षवाढीसाठी प्रत्येकांनी प्रचंड काम केले पाहिजे.  युवा आघाडीने पक्षात कोणावर अन्याय होणार नाही यासाठी  प्रयत्न केले पाहिजे. युवकांनी पक्षाच्या हितासाठी नेहमी अग्रेसर रहावे ; पक्षसुध्दा युवा आघाडी सोबत राहील असेही ते म्हणाले.
    याप्रसंगी ज्येष्ठ नेते शाम निलंगेकर, महानगर उपाध्यक्ष संजय टिके, डॉ.सिध्दार्थ भेदने, सुरेश गजभारे, जयदीप पैठणे, जय डोईबोळे, सचिन नवघडे, प्रकशभाऊ वाघमारे , दीपक पवळे, अमोल पट्टेवाड, सुनिल गर्दनमारे, आय.टी. प्रमुख रोहन कहाळेकर, सुनिल वाघमारे सर्व युवा आघाडी समन्वयक समिती आणि पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

1 comment:

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News