मारेगाव ( व) परिक्षेत्रस्तरीय मूल्यवर्धन कार्यशाळा क्मठाला येथे उत्साहात संपन्न - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, September 28, 2019

मारेगाव ( व) परिक्षेत्रस्तरीय मूल्यवर्धन कार्यशाळा क्मठाला येथे उत्साहात संपन्न




किनवट :
शांतीलाल मुथ्था फाउंडेशन यांच्या सौजन्याने आयोजित केलेली मारेगाव ( वरचे ) परिक्षेत्रस्तरीय तीन दिवसीय  मूल्यवर्धन कार्यशाळा  केंद्रीय प्राथमिक शाळा कमठाला येथे उत्साहात संपन्न झाली.
         मारेगाव ( वरचे ) परिक्षेत्राचे प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी दि.खुडे यांच्या संनियंत्रनाखाली  ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत साधनव्यक्ती म्हणून चंद्रशेखर सर्पे व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका शालिनी सेलुकर  यांनी उत्कृष्टरित्या प्रशिक्षण देवून मूल्यवर्धन म्हणजे काय ? व ते विद्यार्थ्यांमध्ये योग्य वेळी  व योग्य वयात कसे रूजवावे याचे योग्य मार्गदर्शन करून शिक्षकांना तीन दिवस पूर्ण वेळ कार्यशाळेत मूल्यांचे शिक्षण दिले.
         गुरूवार ते शनिवार ( दि. २६ ते .२८ ) या कालावधीत आयोजित कार्यशाळेत विशेष म्हणजे शि.वि.अ. शिवाजी खुडे , केंद्रप्रमुख विजय मडावी व केंद्रप्रमुख प्रकाश होळकर यांची पूर्णवेळ उपस्थिती होती.
        समारोपीय कार्यक्रमात अनमोल गायकवाड, सुरेश पाटील, एस.एस.कनकावार, विष्णू मुनेश्वर, संगिता भवरे,सत्यभामा भगत व ललिता येलमेवार यांनी आपल्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या.
      केंद्रप्रमुख विजय मडावी व शिवाजी खुडे  यांनी प्रोत्साहन पर भाषण करून शिक्षकांना त्यांच्या स्तुत्य कार्याबद्दल आपूलकी व शाबासकी देवून गौरवीले.
   शाहीन गुलाबबे यांनी सुत्रसंचालन  केले.कमठाला संकुलाचे केंद्रिय मुख्याध्यापक अंकुश राऊत यांनी कोणताही शासकीय निधी नसतांना सर्व शिक्षकांची भोजन व्यवस्था केली. शरद कुरूंदकर यांनी तांत्रिक सहाय्य केले.

4 comments:

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News