नांदेड :
सदृढ निरोगी जिवनासाठी नियमित साबणाने स्वच्छ हात धुणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डी.यू. इंगोले यांनी केले.
जागतिक हात धुवा दिनानिमित्त मंगळवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी उमरी तालुक्यातील नागठाना बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गट विकास अधिकारी अमोल अंदेलवाड, सहाय्यक गट विकास अधिकारी पी.के. नारवटकर, विस्तार अधिकारी एन.एम.मुकनर, मुख्याध्यापक एन.आर. झंवर, क्षमता बांधणी तज्ञ चैतन्य तांदुळवाडीकर, ग्रामसेवक एस.एम.पगलवाड, तालुका गट समन्वयक संजय तुरेवाले आदींची उपस्थिती होती.
पुढे ते म्हणाले, विशेषतः यामध्ये स्वयंपाक करण्यापूर्वी, शौचाहून आल्यावर, जेवणापूर्वी, बाळाला भरविण्यापूर्वी साबणाने हात धुणे आवश्यक आहे. नियमित साबणाने हात धुण्याच्या सवयीमुळे आजारांवर नियंत्रण मिळवता येते असेही ते म्हणाले.
प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांना दिले स्वच्छतेचे धडे
जिल्हयातील सर्व शाळांमध्ये आज मोठया प्रमाणावर जागतिक हात धुण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे देण्यात आले. यावेळी अनेक शाळांमधून नियमित साबणाने हात धुण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.
लोहा तालुक्यातील उमरा येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे स्वच्छता तज्ञ विशाल कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व सांगून हात धुण्याचे प्रात्यक्षिक करुन दाखवले. नांदेड पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी उमाकात तोटावार यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलेल्या जागतिक हात धुवा कार्यक्रमात सहाय्यक गट विकास अधिकारी अनिता सरोदे, विस्तार अधिकारी दीपक बच्चेवार, भगवान गलांडे, अधिक्षक शाहिन बेगम, शंकर लाड, तालुका कक्षाचे चंद्रमुणी कांबळे, माहिनी जाधव, प्रणिता जाधव, कविता पंडीत, शेख अहेमद, कामाजी सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.
माहूर तालुक्यातील लिंबायत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे झालेल्या कार्यक्रमात गट समन्वयक राजीव जाधव, बुध्दरत्न गोवंदे, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, शिक्षक व विद्यार्थी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. देगलुर तालुक्यातील कारेगाव, बल्लुर, गवंडगाव, काठेवाडी, होट्टल, रामपूर बुद्रुक आदी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी हात धुण्याचे प्रात्यक्षिक केले. यावेळी दुदलवाड, बालासाहेब शिंदे, सुनिल भोपाळकर, ग्रामसेविका वाडीकर, गोपछडे, जाधव यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व गावकरी यांची उपस्थिती होती. किनवट तालुक्यातील ईस्लापुर येथे स्वच्छ भारत मिशन कक्षाचे समाजशास्त्रज्ञ महेंद्र वाठोरे यांनी ग्रामस्थांना नियमित हात धुण्याचे महत्व पटवून दिले. जिल्हयात जागतिक हात धुवा दिनानिमित्त जिल्हयातील शाळा व अंगणवाडीसह ग्राम पंचायतीमध्ये हात धुण्याचे प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले.
No comments:
Post a Comment