गुरूवारी रात्री 11 वाजता 11 निगेटिव्ह, 1 पॉझिटिव्ह ; शुक्रवारी सकाळी 9 वाजता दोघांचा मृत्यू, नांदेड बाधित@225, मृत्यू@13 - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, June 12, 2020

गुरूवारी रात्री 11 वाजता 11 निगेटिव्ह, 1 पॉझिटिव्ह ; शुक्रवारी सकाळी 9 वाजता दोघांचा मृत्यू, नांदेड बाधित@225, मृत्यू@13


नांदेड : मागील दोन -तीन दिवसात दोन अंकी संख्येत कोरोनाच्या रुग्णांची वाढ होत असतानाच गुरूवारी (ता. 11 ) रात्री अकरा वाजता 11 अहवाल निगेटिव्ह आले असून एक पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे. बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी उपचारादरम्यान मृत्यूही होत आहेत. रात्रीतून दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती शुक्रवारी (ता.12 ) सकाळी 9 वाजता आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे.
           गुरुवारी (ता.11 ) पाच वाजता 21 व रात्री 11 वाजता एक असे एकाच दिवशी 22 नवे रुग्ण वाढले. ही नांदेडातील लालवाडी परिसराजवळील बरकतपूरा येथील 55 वर्षीय महिला रूग्ण असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. तर 1 जणाचा मृत्यू झाला होता.
           शुक्रवार दि.12 जून रोजी नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या उमरखेड जि. यवतमाळ येथील 74 वर्षीय इसमाचा मध्यरात्री मृत्यू झाला. या रुग्णाचा स्वॅब 4 जून रोजी पॉझिटिव्ह आला होता.
           नांदेड शहरातील चौफाळा येथील 52 वर्षीय महिलेचा गुरुवारी (ता.11 ) स्वॅब पॉझिटिव्ह आला होता,या महिलेचा मृत्यू शुक्रवारी (ता.12 जून रोजी ) सकाळी सात वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 13 झाली आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधीत एकूण रुग्ण संख्या 225 झाली आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News