शिवणी प्रा.आ.केंद्रातील 'देशभक्ती पार्क' सारखे आकर्षक वृक्षारोपण करून पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठीच्या मोहिमेत प्रत्येकांनी आपले योगदान द्यावे -मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुलकर्णी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, July 17, 2020

शिवणी प्रा.आ.केंद्रातील 'देशभक्ती पार्क' सारखे आकर्षक वृक्षारोपण करून पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठीच्या मोहिमेत प्रत्येकांनी आपले योगदान द्यावे -मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुलकर्णी



शिवणी व अप्पारावपेठ येथील आरोग्य केंद्रात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण
शिवणी (प्रकाश कारलेवाड) : मागील दहावर्षापूर्वी पर्यावरण संदर्भात गांभिर्याने चर्चा सुरू असताना त्याचे चटके अल्पावधीतच इतक्या गांभिर्याने  भोगावे लागतील याची कल्पना  नव्हती मात्र आता पुढच्या पिढीसाठी पर्यावरण जपणे या पिढीचे कर्तव्य आहे. तेव्हा किनवट तालुक्यातील शिवणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील 'देशभक्ती पार्क' सारखे आकर्षक वृक्षारोपण करून पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठीच्या मोहिमेत प्रत्येकांनी आपले योगदान द्यावे.जपानचे वनस्पती पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. अकीरा मियावाकी यांच्या संकल्पनेतून जगभर ही संकल्पना राबवली जात असल्याचे  प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांनी  केले.
                किनवट तालुक्यातील शिवणी व अप्पारावपेठ येथील प्रार्थमिक आरोग्य केंद्रात बुधवारी (दि.१५ जुलै  ) अटल आनंद घनवन योजना मियावाकी प्रकल्पांतर्गत वृक्षारोप व 'देशभक्ती पार्क' चे उद्घाटन करतांना ते बोलत होते.
                 यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता अभियान ) दिलीप इंगोले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा ) व्ही.आर.पाटील,उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत ) व्ही. आर. कोंडेकर, गट विकास अधिकारी  सुभाष धनवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, गटशिक्षणाधिकारी सुभाष पवने, वैद्यकीय अधिकारी डॉ. के.एस. मुंडे, डॉ. यु.ए पोघे, डॉ. आर.के टोनपे, औषध निर्माण अधिकारी पी. एम. गिरासे, विस्तार अधिकारी कैलास रेनेवाड, देविदास उडतेवार व तांत्रिक अधिकारी  सचिन येरेकार, डॉ हनवते, ग्रामविकास अधिकारी एस.बी.फुलारी, सरपंच प्रतिनिधी दिगांबर बोंदरवाड, पत्रकार भोजराज देशमुख, प्रकाश कारलेवाड व गावातील अन्य निसर्ग प्रेमी नागरिक उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण झाल्यानंतर येथील आरोग्य वर्धिनी केंद्राद्वारे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संकल्पनेतून व श्रमदानातून  निर्मिती करण्यात आलेल्या  'देशभक्ती पार्क' चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी पार्क परिसराची  पाहणी केली 'देशभक्ती पार्क' हे शिवणी परिसरातल्या निसर्गरम्य सौंदर्यात भर घालणारे असून या पार्कमध्ये जलसंधारण कुंडी व नैसर्गिक पाण्याचा धबधबा निर्माण केला आहे. चिमणी पाखरं व इतर पक्षांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. या सोबतच  विविध प्रकारच्या औषधी वनस्पती, झाडे व अनेक प्रकारची फुले व फळाची झाडे असून बसण्यासाठी बाके (खुर्ची) असून  मान्यवरांनी पाहणी करून याची प्रशंसा केली.
          या देशभक्ती पार्क निर्माण व वृक्षारोपण कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी लक्ष्मी , वनोलकर, वाघमारे, शेख, ममता कट्टलवाड व इतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
अप्पारावपेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वरील सर्व अधिकारी आणि मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र मंडगिकर, डॉ. विनोद  बीजमवार, डॉ. सुशील वाडेकर व प्रार्थमिक आरोग्य केंद्र अप्पारावपेठ येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News