113 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी, 118 बाधितांची भर तर पाच जणांचा मृत्यू - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, August 24, 2020

113 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी, 118 बाधितांची भर तर पाच जणांचा मृत्यू

   

 

 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- सोमवार 24 ऑगस्ट 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 113 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 118 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 67 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 51 बाधित आले.

 

आजच्या एकुण 545 अहवालापैकी  359 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 5 हजार 150 एवढी झाली असून यातील 3 हजार 328 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 598 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 143 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. 

 

रविवार 23 ऑगस्ट 2020 रोजी जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील आंतरगाव येथील 65 वर्षाचा पुरुषशक्तीनगर नांदेड येथील 25 वर्षाची एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णपुरी नांदेड येथे तर सहयोगनगर नांदेड येथील 65 वर्षाच्या पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर सोमवार 24 ऑगस्ट 2020 रोजी प्रगतीनगर नांदेड येथील 68 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड येथे तर शिवाजीनगर नांदेड येथील 78 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड यांचा मृत्तांमध्ये समावेश आहे.

  

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 2 हदगाव कोविड केअर सेंटर येथील 4लोहा कोविड केअर सेंटर येथे 5मुदखेड कोविड केअर सेंटर 7, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 71देगलूर जैनब कोविड केअर सेंटर 19खाजगी रुग्णालय 4गोंकुदा कोविड केंअर सेटर 1,

113 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.   

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 18, नायगाव 2देगलूर तालुक्यात 4, कंधार तालुक्यात 2, धर्माबाद तालुक्यात 1, परभणी 2, लोहा तालुक्यात 5, हदगाव तालुक्यात 6, किनवट तालुक्यात 1मुखेड तालुक्यात 24हिंगोली 2 असे एकुण 67 बाधित आढळले. 

 

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपाक्षेत्र 13, नांदेड ग्रामीण 1, अर्धापूर तालुक्यात 13, देगलूर तालुक्यात 1, लोहा तालुक्यात 1, हदगाव तालुक्यात 2, किनवट तालुक्यात 5, मुखेड तालुक्यात 1, मुदखेड तालुक्यात 8, बिलोली तालुक्यात 4, धर्माबाद तालुक्यात 2  असे एकुण 51 बाधित आढळले. 

 

जिल्ह्यात 1 हजार 598 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 174, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 667, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 53, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 37, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 39, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 126,  देगलूर कोविड केअर सेंटर येथे 36, लोहा कोविड केअर सेंटर येथे 45, हदगाव कोविड केअर सेंटर 39, भोकर कोविड केअर सेंटर 12,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 22,  किनवट कोविड केअर सेंटर येथे 24, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 24, मुदखेड कोविड केअर सेटर 27,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 9, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 20, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 72,उमरी कोविड केअर सेंटर 36, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 2, बारड कोविड केअर सेंटर 1खाजगी रुग्णालयात 128 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 4, निजामाबाद येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत.  

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

सर्वेक्षण- 1 लाख 51 हजार 164,

घेतलेले स्वॅब- 35 हजार 248,

निगेटिव्ह स्वॅब- 28 हजार 78,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 118,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 5 हजार 150,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-21,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 17,

एकूण मृत्यू संख्या- 188,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 3 हजार 328,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 598,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 268, 

आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 143. 

 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News