नांदेड (जिमाका) दि. 7 :- शनिवार 7 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 42 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 30 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 21 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 9 बाधित आले.
आजच्या एकुण 1 हजार 162 अहवालापैकी 1 हजार 125 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 19 हजार 408 एवढी झाली असून यातील 18 हजार 297 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 418 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 24 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.
आज रोजी प्राप्त अहवालानुसार चार रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शुक्रवार 6 नोव्हेंबर 2020 रोजी शिवाजीनगर नांदेड येथील 63 वर्षाच्या एका पुरुषाचा, लोहार गल्ली नांदेड येथील 76 वर्षाच्या एका पुरुषाचा, महात्मा फुले नगर अर्धापूर येथील 79 वर्षाच्या पुरुषाचा खाजगी रुग्णालयात तर 53 वर्षाच्या पुरुषाचा जिल्हा रुग्णालय परिसर नांदेड येथील जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 525 झाली आहे.
आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 22, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 6, बिलोली कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 8, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 3, खाजगी रुग्णालय 3 असे एकूण 42 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.25 टक्के आहे.
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 17, हदगाव तालुक्यात 1, मुखेड 2, यवतमाळ 1 असे एकुण 21 बाधित आढळले.
तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 5, अर्धापूर तालुक्यात 1, नांदेड ग्रामीण 2, हिंगोली 1 असे एकूण 9 बाधित आढळले.
जिल्ह्यात 418 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 47, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 33, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 39, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 148, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 5, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 23, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 10, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 5, लोहा कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 7, बिलोली कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 9, भोकर कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 17, बारड अंतर्गत गृह विलगीकरण 1, धर्माबाद तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1, हिमायतनगर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 3, कंधार तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4, मांडवी अंतर्गत गृह विलगीकरण 1, अर्धापूर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 17, मुदखेड तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1, खाजगी रुग्णालय 47 आहेत.
शनिवार 7 नोव्हेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 157, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 76 एवढी आहे.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 20 हजार 817
निगेटिव्ह स्वॅब- 97 हजार 955
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 19 हजार 408
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 18 हजार 297
एकूण मृत्यू संख्या- 525
उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.25 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-4
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-3
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 416
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 418
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले 24.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.




No comments:
Post a Comment