रमेश मुनेश्वर यांची अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला व क्रीडा मंडळाच्या औरंगाबाद विभागीय अध्यक्षपदी निवड - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, November 23, 2020

रमेश मुनेश्वर यांची अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला व क्रीडा मंडळाच्या औरंगाबाद विभागीय अध्यक्षपदी निवड

 



नांदेड  : अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला व क्रीडा मंडळ या नोंदणीकृत संस्थेच्या औरंगाबाद विभागीय अध्यक्षपदी रमेश यादवराव मुनेश्वर यांची निवड करण्यात आली.


अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला व क्रीडा मंडळ शिक्षकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व प्रसिद्धी देण्यासाठी असून या मंडळाद्वारे आजपर्यंत अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. 


रमेश मुनेश्वर यांच्या सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन अध्यक्षपदी निवड करण्यात आली. रमेश मुनेश्वर हे नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षक असून उत्तम कवी, लेखक, समिक्षक, नाट्य कलावंत म्हणून प्रसिद्ध आहेत. सोबतच उपक्रमशील शिक्षक व शालेयवृत्त या वेब न्यूज पोर्टलचे संपादक आहेत. मासिक, दिवाळी अंक,साप्ताहिक व दैनिकात त्यांचे अनेक साहित्य प्रकाशित झालेले आहे.


त्यांच्या या निवडीबदल संस्थापक राज्याध्यक्ष नटराज मोरे, राज्य कार्यकारणीचे विजय जोगमार्ग, सचिन कुसनाळे, अलंकार वारघडे, नांदेड कार्यकारणीचे मिलिंद जाधव, विरभद्र मिरेवाड, रणजीत वर्मा, नासा येवतीकर, रुपेश मुनेश्वर, महेंद्र नरवाडे, राणी नेम्मानिवार, राजश्री विभुते, उर्मिला परभणकर, विजया तारु, सागर चेके, मिलिंद कंधारे, शेषेराव पाटील, आनंद गायकवाड,  प्रल्हाद जोंधळे, सूर्यभान खंदारे, सोनबा दवणे, भूमय्या इंदूरवार, रामस्वरुप मडावी आदिनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News