*नांदेड जिल्ह्यात 1 हजार 255 व्यक्ती कोरोना बाधित* *26 जणांचा मृत्यू* ▪️जनसहयोगातून आरोग्य जागराच्या मोहिमेत सहभाग घ्या - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, April 7, 2021

*नांदेड जिल्ह्यात 1 हजार 255 व्यक्ती कोरोना बाधित* *26 जणांचा मृत्यू* ▪️जनसहयोगातून आरोग्य जागराच्या मोहिमेत सहभाग घ्या






नांदेड (जिमाका) दि. 7 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 4 हजार 534 अहवालापैकी 1 हजार 255 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 506 तर अँटिजेन तपासणीद्वारे 749 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 50 हजार 892 एवढी झाली असून यातील 38 हजार 891 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 10 हजार 783 रुग्ण उपचार घेत असून 189 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

दिनांक 3 ते 6 एप्रिल या चार दिवसांच्या कालावधीत 26 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 970 एवढी झाली आहे.   दिनांक 3 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे अर्धापूर तालुक्यातील चांभरा येथील 65 वर्षाचा पुरुष, वात्सल्य नगर नांदेड येथील 46 वर्षाचा पुरुष, जुना मोंढा नांदेड येथील 62 वर्षाचा पुरुष, शिवाजी नगर नांदेड येथील 93 वर्षाचा पुरुष, दिनांक 4 एप्रिल रोजी चैतन्य नगर नांदेड येथील 65 वर्षाची महिला, अर्धापूर तालुक्यातील चांभरा येथील 75 वर्षाचा पुरुष, नांदेड येथील 70 वर्षाची महिला, किनवट तालुक्यातील इसलापूर येथील 65 वर्षाची महिला, चौफाळा नांदेड येथील 58 वर्षाची महिला, सिडको नांदेड येथील 42 वर्षाचा पुरुष, चैतन्य नगर नांदेड 75 वर्षाची माहिला, दिनांक 5 एप्रिल रोजी  शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड तालुक्यातील निळा येथील 70 वर्षाचा पुरुष, जुना मोंढा नांदेड येथील 60 वर्षाची महिला, देगलूर कोविड रुग्णालय देगलूर तालुक्यातील टाकळीझरी येथील 60 वर्षाचा पुरुष, नायगाव तालुक्यातील शेळगाव येथील 50 वर्षाची महिला, भगवती कोविड रुग्णालय वजिराबाद नांदेड येथील 32 वर्षाचा पुरुष, तरोडा बु. नांदेड येथील 40 वर्षाचा पुरुष, तिरुमला कोविड रुग्णालय नांदेड येथील 70 वर्षाची महिला, दिनांक 6 एप्रिल रोजी हदगाव कोविड रुग्णालय हदगाव येथील आझाद चौक येथील 57 वर्षाचा पुरुष, भक्ती कोविड रुग्णालय कल्याण नगर येथील 52 वर्षाचा पुरुष, गोदावरी कोविड रुग्णालय फरांदे नगर नांदेड येथील 72 वर्षाचा पुरुष, लोट्स कोविड रुग्णालय सुमेध नगर नांदेड येथील 68 वर्षाचा पुरुष, आश्विनी कोविड रुग्णालय विष्णुपूरी नांदेड येथील 73 वर्षाचा पुरुष, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथील गोकुळ नगर देगलूर येथील 52 वर्षाचा पुरुष, धर्माबाद येथील 43 वर्ष पुरुष, देगलूर येथील 76 वर्षाचा पुरुष असे एकूण 26 रुग्ण उपचारादरम्यान मृत पावले.

 

आज रोजी 1 हजार 142 बाधितांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी 15, मनपा अंतर्गत एन.आर.आय. भवन व गृह विलगीकरण 772, कंधार तालुक्याअंतर्गत 2, किनवट कोविड रुग्णालय 17, हिमायतनगर तालुक्याअंतर्गत 9, भोकर तालुक्याअंतर्गत 49, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 18, उमरी तालुक्यातंर्गत 21, नायगाव तालुक्याअंतर्गत   29 , मुखेड कोविड रुग्णालय 7, देगलूर तालुक्याअंतर्गत   7 , अर्धापूर तालुक्याअंतर्गत  12, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 12, हदगाव कोविड रुग्णालय 6, माहूर तालुक्याअंतर्गत   11, धर्माबाद तालुक्याअंतर्गत  11, लोहा तालुक्याअंतर्गत  28, खाजगी रुग्णालय 116 असे एकूण 1 हजार 142 बाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.41 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 238, देगलूर 19, कंधार 36, मुदखेड 2, हिंगोली 3, नांदेड ग्रामीण 13, धर्माबाद 18, किनवट 9, मुखेड 32, यवतमाळ 1, अर्धापूर 9, हदगाव 60, लोहा 1, नायगाव 30, भोकर 20, हिमायतनगर 13, माहूर 1, परभणी 1 असे एकूण 506 बाधित आढळले.

 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 268, बिलोली 21, हिमायतनगर 18, मुदखेड 6, कंधार 48, नांदेड ग्रामीण 30, देगलूर 39, किनवट 101, मुखेड 52, नायगाव 20, अर्धापूर 30 , धर्माबाद 13, लोहा 19, उमरी 26, हिंगोली 1, भोकर 23, हदगाव 26, माहूर 4, परभणी 3, यवतमाळ 1 असे एकूण 749 व्यक्ती अँन्टिजेन तपासणीद्वारे बाधित आले आहेत.

 

जिल्ह्यात 10 हजार 783 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 234, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 108, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 195, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 125, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 132, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 186, देगलूर कोविड रुग्णालय 52, जैनब हॉस्पिटल कोविड केअर सेंटर 106, बिलोली कोविड केअर सेंटर 259, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 17, नायगाव कोविड केअर सेंटर 96, उमरी कोविड केअर सेंटर 32, माहूर कोविड केअर सेंटर 20, भोकर कोविड केअर सेंटर 24, हदगाव कोविड रुग्णालय 45, हदगाव कोविड केअर सेंटर 52, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 116, कंधार कोविड केअर सेंटर 20, धर्माबाद कोविड केअर सेंटर 72, मुदखेड कोविड केअर सेंटर 11, अर्धापूर कोविड केअर सेंटर 26, बारड कोविड केअर सेंटर 40, मांडवी कोविड केअर सेंटर 8, महसूल कोविड केअर सेंटर 119, एनआरआय कोविड केअर सेंटर 200, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 152, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 4 हजार 660, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 2 हजार 136, खाजगी रुग्णालय 1 हजार 540 असे एकूण 10 हजार 783 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 7, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 6 खाटा उपलब्ध आहेत.

 

*जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.*

एकुण घेतलेले स्वॅब- 3 लाख 49 हजार 593

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 91 हजार 624

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 50 हजार 892

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 38 हजार 891

एकुण मृत्यू संख्या-970

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.41 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-7

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-58

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-384

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-10 हजार 783

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-189.


 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News