किनवट मतदार संघातील रस्ते विकासासाठी आमदार केराम यांच्या प्रयत्नाला यश... रस्ते विकास मंत्री गडकरी भेटीचे सार्थक झाले ; 22 कोटी 82 लक्ष रुपयांच्या रस्ते विकास कामांना मंजुरी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, April 7, 2021

किनवट मतदार संघातील रस्ते विकासासाठी आमदार केराम यांच्या प्रयत्नाला यश... रस्ते विकास मंत्री गडकरी भेटीचे सार्थक झाले ; 22 कोटी 82 लक्ष रुपयांच्या रस्ते विकास कामांना मंजुरी

 





किनवट : किनवट-माहूर मतदारसंघातील रस्ते विकास कामाच्या संदर्भाने जानेवारी महिन्यात आमदार भीमराव केराम यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन किनवट-माहूर तालुक्यातील रस्ते सुधारण्यासाठी निधीची मान्यता व अधिकचा रस्ते कामांना मंजुरी देण्याची आग्रही विनंती केली होती. आमदार केराम यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून नामदार गडकरी यांनी किनवट तालुक्यातील चार व माहूर तालुक्यातील एक अशा पद्धतीने प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पाच कामे (22 कोटी 82 लक्ष रुपये निधी ) मंजूर केली आहेत. सत्तेत नसतांना एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणण्यात आमदार केराम यांना यश मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून आमदार भीमराव केराम यांनी मात्र केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे आभार मानले.

       माहूर आणि किनवट तालुक्यातील आदिवासी, अतिदुर्गम डोंगराळ, बंजारा बहुल खेडे, पाडे,वाडी व तांड्यामध्ये चांगल्या रस्त्यांचा अभाव होता. यामुळे अशा खेडेगावात राहणाऱ्या लोकांना आरोग्य व इतर सुविधांसाठी शहरांच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत चांगले रस्ते निर्माण करणे अत्यंत गरजेचे असल्याची गाठ मनाशी बांधून किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी राज्यात आपली सत्ता नसतानादेखील रस्ते विकास कामे हाती घेण्याचा दृढनिश्चय केला. दूरगामी परिणामाच्या प्रेरणेने प्रेरित होऊन आ वासून उभ्या टाकलेल्या रस्ते विकासाच्या समस्या घेऊन दिनांक 5 जानेवारी रोजी केंद्रीय परिवहन व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे माहूर आणि किनवट तालुक्यातील रस्त्याच्या दयनीय अवस्थेचा पाढा वाचला आणि एक विस्तीर्ण निवेदन देऊन रस्ते विकास कामासाठी निधीची मागणी केली. आमदार केराम फक्त निवेदन देऊन मागणी करण्यावरच थांबले नाहीत. तर सदर रस्त्यांच्या कामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देऊन कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली होती. याचा सात पाठपुरावा सुध्दा केला. या मागणीचा सकारात्मक विचार करून नामदार नितीन गडकरी यांनी माहूर आणि किनवट तालुक्यामधील रस्ते विकास कामासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत किनवट तालुक्यातील इस्लापूर - कोल्हारी - हुडी - इस्लापूर 3 कोटी 96 लक्ष, इस्लापूर - पांगरी - भिसी 4 कोटी 59 लक्ष, मांडवी - लिंगी तांडा - लिंगी 3 कोटी 96 लक्ष, कनकी - मिनकी - तलाईगुडा 5 कोटी 71 लक्ष आणि माहूर तालुक्यातील अंजनखेड - नाईकवाडी - सावरखेड 4 कोटी 60 लक्ष रुपये इतक्या निधीची तरतूद करून मान्यता दिली आहे. लवकरच या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार असून आमदार भीमराव केराम यांची नामदार गडकरी यांच्यासोबत झालेली भेट खऱ्या अर्थाने सार्थक झाल्याची सुख:द चर्चा ऐकायला मिळत आहे. नामदार नितिन गडकरी यांनी आमदार केराम यांच्याकडून मांडण्यात आलेल्या निवेदनाला अवघ्या काही महिन्यातच मूर्तरूप दिल्याने आमदार केराम यांनी मतदार संघातील जनतेच्या वतीने नामदार गडकरी यांचे आभार व्यक्त केले आहे. तसेच यापुढेही किनवट विधानसभा मतदार संघाचा विकास साध्य करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News