२३ एप्रिल जागतिक पुस्तकदिनामुळे विशेष पुस्तक समीक्षण *सामान्यांचा संघर्ष मांडणारा - जीवन संघर्ष* (समिक्षण : अ.भा. ठाकूर , मु.पो. जवळा, तालुका : आणी, जिल्हा: यवतमाळ ) - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, April 23, 2021

२३ एप्रिल जागतिक पुस्तकदिनामुळे विशेष पुस्तक समीक्षण *सामान्यांचा संघर्ष मांडणारा - जीवन संघर्ष* (समिक्षण : अ.भा. ठाकूर , मु.पो. जवळा, तालुका : आणी, जिल्हा: यवतमाळ )


३ एप्रिल जागतिक पुस्तकदिनामुळे विशेष पुस्तक समीक्षण

 
*सामान्यांचा संघर्ष मांडणारा - जीवन संघर्ष*

(समिक्षण : अ.भा. ठाकूर ,  मु.पो. जवळा, तालुका : आणी, जिल्हा: यवतमाळ  )

       मानवी आयुष्य म्हणजे पदोपदी संघर्ष आणि  हा संघर्ष नवनाथ रणखांबे यांनी आपल्या  *जीवन संघर्ष*  या  कविता संग्रहात समर्थपणे मांडलेला आहे.
      समाजाला खरी समस्या जर कोणती असेल तर ती आहे आपल्या  भुकेची आग विझविण्याची आणि याचे वर्णन  'भटकंती पोटाची अधोगती देशाची '  या कवितेमध्ये कवी खालील प्रमाणे करतो
            गावोगावी फिरतांना
            वसुदेवाची फेरी.....
            कथांची स्टोरी 
            डोंबऱ्याचा खेळ
            कसरतीचा मेळ

                  (  जीवन संघर्ष - २६ )

    पाऊस हा नवजीवन खुलवणारा असला तरी बरसणार पाऊस मात्र त्रेधातिरपट  करतो.  ही खरी व्यथा 'माजोऱ्या पाऊसा'  या कवितेत मांडण्यात आले आहे.
            जिथे गरज तिथे नाहीस
            जिथे नको तिथे आहेस
           तुझी हानी सहन होत नाय
           सोसल्या शिवाय पर्याय नाय
     या ठिकाणी आपल्याला दुष्काळाची दोन्ही रूप पाहायला मिळते.  जसे ओला दुष्काळ ,  कोरडा दुष्काळ या दोन्ही दुष्काळाची निर्मिती मात्र होते पावसानेच.  याचे वास्तविक चित्रण मांडले गेलेले आहे.
      लोकशाही प्रक्रियेचा विकास अगदी थोडक्यात अडून बलेला पहायला मिळतो.  'आलेला निधी'  या कवितेत कागदी घोडे कसे नाचतात  किंबहुना नाचवले जातात याचा परिपूर्ण प्रकार यामध्ये वर्णीत आहे.

               कागदाने वळवलाय
              आलेला निधी
              परत घालवलाय
              सर्वांगिन विकास  
              कागदाचा झालाय 

                      (   जीवन संघर्ष - ४२)

     निसर्ग आपला सोबती या न्यायाने निसर्ग आपल्याला भरभरून देतो त्याचे वर्णन   'माझी पहाट'  या कवितेत आलेला आहे. 

       माझी पहाट 
       सुंदर होती चालत...
       अदभूत देखावे
        सुंदर होती पाहत ...!
 
                        ( जीवन संघर्ष -६२)
     
    या प्रमाणे या कविता संग्रहात एकूण ४६ कविता असून प्रा. डॉ. शाहजी कांबळे  यांची प्रस्तावना लाभली आहे.  शारदा प्रकाशन ठाणे , द्वारे  प्रकाशित या कविता संग्रहाचे मुखपृष्ठ सतिश खोत यांचे आहे. सदर काव्यसंग्रह वाचनीय असा आहे.

       
      पुस्तक :- जीवन संघर्ष
      पाने :- ८०
      मूल्य :- ८० ₹
     कवी :- नवनाथ रणखांबे
     प्रकाशन :- शारदा प्रकाश  ठाणे
    समिक्षण :  अ. भा. ठाकूर , मु.पो. जवळा, तालुका : आर्णी  , जिल्हा :  यवतमाळ,  पिन : ४४५१०५
मोबाईल : ९९७५३७९१६६

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News