केरोसिनचे सुधारित दर जाहिर - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, June 23, 2021

केरोसिनचे सुधारित दर जाहिर

 



 

मुंबई, दि.23 : नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांच्याकडून केरोसिनचे दरासंदर्भात माहिती नुकतीच प्रसिद्ध केली आहे. मुंबईसाठी, (मुंबई शहर व मुंबई उपनगर) केरोसीनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दर दिनांक 01 जून 2021 पासून लागू करण्यात येतील. किरकोळ विक्रीचा सध्याचा दर (रुपये प्रति लिटर) 36.87 इतका तर सुधारीत दर 39.45 इतका आहे. शासन परिपत्रक क्र. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग क्रमांक – केईआर-1376/3769/सतरा, दि. 17 डिसेंबर 1976 नुसार पुर्णांकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.अशी माहिती कैलास पगारे, संचालक, नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News