जिल्हाप्रमुख पदासाठी ज्योतिबा खराटेंसाठी कार्यकर्ते आग्रही.. - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, June 23, 2021

जिल्हाप्रमुख पदासाठी ज्योतिबा खराटेंसाठी कार्यकर्ते आग्रही..

 



श्रीक्षेञ माहूर : माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांचा नांदेड जिल्हयाच्या राजकारणात कायमच वरचष्मा राहीला आहे. तरी यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत ९ पैकी ४ जागा पटकावण्याचे दिव्य    शिवसेनेने पार केल्याची सत्यता कदापि विसरता येणार नाही.मात्र  यावेळीच्या निवडणुकीत  फक्त एकच जागा पदरी पडल्याने पक्षाच्या  प्रतिष्ठेला चांगलाच तडा गेला आहे.राज्याच्या  मुख्यमंत्री पदी उद्धव ठाकरे हेच विराजमान असल्याने पक्षाला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देणे अगत्याचे झाले आहे.  त्याकरिता एका कर्तबगार शिलेदाराची जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती होणे  काळाची गरज बनली  आहे.

                   जिल्हाप्रमुख पदासाठी उपजिल्हा प्रमुख  ज्योतीबा खराटे,दत्ता कोकाटे,उमेश मुंडे,आनंदा बोंढारकर,प्रकाश मारावार,माधव पावडे,बाळासाहेब देशमुख,आकाश रेड्डी,गंगाधर बडुरे या    दिग्गज मंडळीने फासे टाकले आहेत.आज पर्यंतचा अनुभव पाहता प्रत्येक निवडणुकीत  ओबीसी समाजाने कायमच शिवसेनेची पाठराखण केली आहे.याव्यतिरिक्त  राज्यातील जातीनिहाय मतदारांची संख्या गृहीत धरल्यास मराठा समाजानंतर माळी समाजाचाच नंबर लागत असल्याने जिल्हा प्रमुख पदासाठी ज्योतीबा खराटे हे शिवसेनेसाठी उत्तम पर्याय आहेत.

     एक तप सत्तेचा वगळता शिवसेनेला  कायम विरोधी पक्षाचीच भूमिका साकारावी लागल्याने अगदी प्रतिकूल परिस्थितीतही माहूर सारख्या आदीवासी व बंजारा बहुल तालुक्यात शिवसेनेचे बीज रोवून त्याचा वटवृक्ष करणे कठीण काम होते ,मात्र ती किमया ज्योतीबा खराटे यांनी साधली असून  झालेला अन्याय पचवून   दाखविलेला संयम व बाळगलेली निष्ठाच त्यांची दावेदारी अधिक मजबूत करण्यासाठी पुरेशी आहे.

       काही वर्षापूर्वी कार्यकर्त्यांशी चर्चा करतांना माजी मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते डी.बी.पाटील यांनी  पहिल्यांदा आमदार म्हणून   मुंबईत गेलो असता माझी  व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट झाली होती. त्यावेळी ' तुझा मतदारसंघ फारच क्लिष्ट आहे.'अशी कबुली त्यांनी दिल्याचा किस्सा सांगितला होता.त्यामुळे  जाणत्या राजांच्या  त्या वाक्यातच ज्योतीबा खराटें यांनी पक्षासाठी   उपसलेल्या कष्टाचे व  यशाचे गूढ तर दडलेच आहे,शिवाय अन्य इच्छुकांच्या तुलनेत ते कसे सरस ठरतात याचे गुपीतही दडलें आहे. पाहूया काय होते ते, घोड़ा मैदान अगदी जवळच आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News