हिंगोली लोकसभा मतदारसंघातील पीकविम्याची रक्कम अदा करण्याची मागणी; खासदार हेमंत पाटील यांनी घेतली कृषिमंत्री दादाजी भुसे यांची भेट - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, September 23, 2021

हिंगोली लोकसभा मतदारसंघातील पीकविम्याची रक्कम अदा करण्याची मागणी; खासदार हेमंत पाटील यांनी घेतली कृषिमंत्री दादाजी भुसे यांची भेट

 


किनवट (नांदेड) : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत  हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शेतकरी पिकविम्यापासून वंचित असून अद्यापही त्यांना अनुदान प्राप्त झाले नसून मतदारसंघात येणाऱ्या हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम अदा करण्यात यावी,  अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे कृषिमंत्री  दादाजी भुसे यांची भेट घेऊन केली आहे. 

        गतवर्षीच्या खरीप हंगामात हिंगोली लोकसभा मतदार संघात येणाऱ्या हदगाव, हिमायतनगर , किनवट , माहूर , हिंगोली, सेनगाव, कळमनुरी, औंढा , वसमत,उमरखेड व महागाव तालुक्यातील शेतकरी पीकविमा योजनेत सहभागी झाले होते. परंतु काही  मोजक्याच शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर झाला होता. तर अनेक शेतकरी पिकविम्यापासून वंचित राहिले होते . यामध्ये हिंगोली जिल्ह्यातून ३ लाख ३ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा  भरला असताना त्यापैकी केवळ १ लाख  ७५ हजार शेतकऱ्यांना ९९ कोटी ५२ लाख रुपये पीकविमा परतावा मंजूर करण्यात आला. त्यापैकी १ लाख ४९ हजार शेतकऱ्यांना परताव्याची ८६ कोटी २५ लाख रुपये एवढी रक्कम अदा करण्यात आली आहे . परंतू राज्य शासनाच्या  हिस्स्याचे अनुदान प्राप्त न झालयामुळे २६ हजार  लाभार्थी शेतकऱ्यांचे १३ कोटी ६७ लाख रुपये परताव्याच्या रकमेचे वाटप शिल्लक आहे . तर हिंगोली लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील  हदगाव,  हिमायतनगर तालुक्यातील एकूण १ लाख १४ हजार ८४५ शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता. त्यापैकी १४ हजार ५९९ शेतकऱ्यांना ८ कोटी ७२ लाख रुपये मंजूर झाले आहेत.  किनवट व माहूर तालुक्यातील एकूण ३० हजार ३१६ शेतकऱ्यांनी खरीप २०२० करिता पीकविमा भरला होता. त्यापैकी ३ हजार ९८१  शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर झाला आणि त्यांना २ कोटी ८ लाख ३८ हजार रुपये एवढी रक्कम पीकविमा परताव्यापोटी रक्कम अदा करण्यात आली होती. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील एकूण ३९ हजार ६४५  शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता. तर त्यापैकी ४ हजार ६९० शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर करण्यात आला आणि त्यांना पिकविम्याची ४ कोटी ७५ लाख एवढी रक्कम अदा करण्यात आली. उमरखेड तालुक्यातील  एकूण ४३ हजार ५१९ शेतकऱ्यांनी पिकविमा भरला होता त्यापैकी ७ हजार ६६५ शेतकऱ्यांना ४ कोटी ८१ लाख रुपये एवढी रक्कम अदा करण्यात आली आहे . तर ज्या शेतकऱ्यांना अद्यापही परतावा मिळाला नसल्याने याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन हिंगोली  लोकसभा मतदारसंघातील पिकविम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पीकविमा मिळवून देण्याबाबत मागणी केली आहे . हिंगोली लोकसभा क्षेत्रात मागील बऱ्याच दिवसापासून अतिवृष्टी  झाल्यामुळे खरीप पिकाचे नुकसान झाले आहे . त्याबाबत तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याबाबत चर्चा केली .

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News