सोनगीर कर यांना जोशाबा'चा सोनगीर रत्न जीवन गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, November 30, 2021

सोनगीर कर यांना जोशाबा'चा सोनगीर रत्न जीवन गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान

 




नवी मुंबई : शिक्षक समुपदेशक बालरक्षक शिक्षक सेना संघटना संघटक मुरलीधर.आर. मोरे यांना जोशीबा सांस्कृतिक क्रीडा मंडळाचा "सोनगीर रत्न जीवन गौरव पुरस्कार " रविवारी (28नोव्हेंबर )  राष्ट्रपिता जोतिराव फुले यांच्या स्मृतीदिनी, मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .

        धुळे जिल्ह्यातील सोनगीर या मोरे यांच्या जन्मगावी सकाळी 10 वाजता एन. जी. बागुल हायस्कूलच्या प्रांगणात झालेल्या पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी न्यायाधीश जे. टी. देसले होते . तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार, श्रम प्रतिष्ठान गुण गौरव समितीचे अध्यक्ष महेश घुगे,डेडरगाव येथील विपश्यना केंद्राचे संचालक व मॉडर्न नर्सरीचे उत्तमराव पाटील,मुंबई येथील कॅन्सर रिसर्च फाउंडेशनचे चेअरमन सागीर देशमुख व सुप्रसिद्ध निवेदक कवी जगदीश देवपूरकर हे मान्यवर उपस्थित होते .

सोहळ्याचे आयोजक जोशाबा मंडळाचे अध्यक्ष दलित व रुग्ण मित्र दिलीप माळी हे आहेत. मोरे यांच्या बरोबरच राज्यपालांचे सेवानिवृत्त उपसचिव  मधुकर देशपांडे,सेवानिवृत्त पोलीस इन्स्पेक्टर झेंडू महाजन ,समुपदेशक -सरचिटणीस म. रा. शिक्षक सेना संपर्क प्रमुख धुळे, नंदुरबार जिल्हा  मुरलीधर मोरे, विठ्ठलरखुमाई पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू पाचपुते या मान्यवरांचा सोनगीर रत्न जीवन पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. तर एन. जी.बागुल हायस्कूलचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत एन. जी. बागुल, माजी विधानपरिषद सदस्य आमदार दिवंगत डॉ.भानुदास जोशी,माजी सरपंच व पंचायत समिती सदस्य दिवंगत श्रीरंग नाना पाटील  व सोनगीरचे पहिले झालेले आय आर एस दिवंगत नारायण धनजी मोरे  यांचा मरणोत्तर सोनगीर रत्न सन्मान देवून गौरव करण्यात येणार आहे.

        नवी मुंबई येथे वास्तव्याला असलेले मुरलीधर मोरे हे अतिशय प्रेमळ, विनम्र  आणि सेवाभावी व्यक्तिमत्व असून  त्यांचे जनसेवेचे कार्य अविरत सुरुच आहे. ते विविध सामाजिक आणि धार्मिक संघटनासी जोडलेले असून ते नेहमीच सामाजिक आणि धार्मिक कार्याला आपलं पाठबळ देत आले आहेत.

         पुरस्काराच्या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया घेतली असता या आधी अनेक पुरस्कार सन्मान मिळाले. पुरस्कार नव्याने काम करण्यास ऊर्जा देतात. हा पुरस्कार आधीच्या पुरस्काराहून वेगळा आहे. जन्म गावाच्यावतीने मिळत असल्यामुळे तो भावनेने ओतप्रोत भरलेला आहे.तो गावासी जोडला गेला असल्यामुळे त्याचे खास असे वेगळंपण आहे. हा पुरस्कार म्हणजे आपल्या आईनं आपलं केलेलं कौतुक आहे अशी मनोभावना त्यांनी व्यक्त केली. ते गावात विधायक करत असून युवावर्गाचे प्रेरणास्रोत आहेत . जय बजरंग व्यायाम शाळा स्थापनेचे संचालक असून डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे उपाध्यक्ष असून मानव संसाधन विकास मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत . त्यांनी विविध सामाजिक धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्यकमाये आयोजन करत होते . सुवर्णगीरी किल्ल्यावर ध्वज लावणे , श्रमदान करणे, शासनाच्या योजना राबविणे प्रसंगी सोनगीर हॉटेल मालकांच्या प्रश्नाबाबत उपोषण करणे व सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचे काम सुध्दा करत असतात .कोरोनाकाळात पोलीसांमार्फत आरोग्य बाबत जनजागृती करणे .प्रतिकारक्षमता वाढीच्या होमीपॅथीच्या गोळ्या वाटणे, मालेगाव काढा वाटणे इ . विधायक काम करीत असतात . अशा ध्येयवेडया अवलियास पुरस्कार प्रदान झाल्याने मित्र परिवार आणि आप्तेस्ट यांच्या कडून मुरलीधर मोरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News