*मराठवाडा स्तरिय पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, December 3, 2021

*मराठवाडा स्तरिय पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन*




उदगीर : उदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने दर वर्षी दिला जाणारा मराठवाडास्तरिय पत्रकारिता पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे.*'शोधवार्ता' व 'उत्कृष्टवार्ता' या दोन गटातील पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.*

सलग 12 वर्षापासून उदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने मराठवाडास्तरीय पत्रकारिता पुरस्काराचे

आयोजन करण्यात येते 'उत्कृष्टवार्ता व 'शोधवार्ता' या दोन गटासाठी

दैनिकाच्या प्रतिनिधीनी 01 डिसेंबर 2020 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधित दैनिकात नावासह प्रकाशित झालेले किंवा नाव नसल्यास संपादकाचे शिफारस पत्र आणि प्रकाशित साहित्याची मुळ प्रत व त्याची तिन साक्षांकित प्रति ,वार्ताहराचे दोन पासपोर्ट फोटो, पाॅकिटावर कोणत्या गटासाठी प्रवेशिका पाठवत आहे त्याचा स्पष्ट नामोल्लेखासह 25 डिसेंबर 2021 पर्यंत *उदगीर तालुका पत्रकार संघ ,व्दारा दैनिक यशवंत विभागिय कार्यालय नगर परिषद व्यापारी संकुल ई बिल्डींग पहिला मजला उदगीर जि. लातूर पिन कोड 413517*

या पत्यावर पाठवावे असे आवाहन करण्यात आले आहे.

स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना *'उत्कृष्ट वार्ता गटात*:*प्रथम* पुरस्कार जेष्ठ पत्रकार कै.महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ अर्जून मुद्दा यांच्या वतीने रोख 5000/-रुपये स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, *व्दितीय* पुरस्कार कै.वसंतराव बांगे याच्या स्मरणार्थ जेष्ठ संपादिका निर्मला बांगे यांच्यावतीने रोख 3000/-रुपये स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र, *तृतीय* पुरस्कार जेष्ठ पत्रकार अनंत अपसिंगेकर यांच्या स्मरणार्थ प्रशांत अपसिंगेकर यांच्या वतीने रोख 2000/- रुपये स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र , *शोधवार्ता गटात*: *प्रथम* पारितोषक जेष्ठ पत्रकार कै.महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ अर्जून मुद्दा यांच्या वतीने रोख 5000/- रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र,*व्दितीय* पारितोषक वृत्तपत्र विद्या विभाग स्वामी विवेकानंद महाविद्यालय यांच्या वतीने रोख 3000/- रुपये ,स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र,जेष्ठ पत्रकार कै. नागनाथअण्णा निडवदे यांच्या स्मरणार्थ अमोल निडवदे यांच्या वतीने 3000/- रुपये रोख स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र *तृतीय* पारितोषक कै.नागनाथराव बिरादार यांच्या स्मरणार्थ दयानंद बिरादार यांच्या वतीने रोख 2000/- स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. या अगोदर उदगीर तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार प्राप्त उत्कृष्ट वार्ता व शोधवार्ता पुरस्कारासाठी मराठवाड्यातील पत्रकारांनी आपली प्रवेशिका पाठवू नये असे आवाहन उदगीर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राम मोतीपवळे ,सचिव दयानंद बिरादार व पदाधिकार्‍यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News