जनहितासाठी भ्रमंती करणारा लोकनेता खासदार हेमंत पाटील -उत्तम कानिंदे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, December 15, 2021

जनहितासाठी भ्रमंती करणारा लोकनेता खासदार हेमंत पाटील -उत्तम कानिंदे

 



 

कुटूंबातील सुख - दुःख विसरून आपल्या विस्तीर्ण मतदारसंघात फिरून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत होरपळून जाणाऱ्या जनतेला दिलासा व शक्य तेवढ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी धडपडणारे जनसेवक हेमंत पाटील यांचा आज वाढ दिवस. त्यानिमित उत्तम कानिंदे यांनी त्यांच्या कार्याचा घेतलेला धावता आढावा येथे देत आहोत. -संपादक 

         
 जे तळागाळातील सर्व सामान्यांसाठी आपलं आयुष्य वेचतात, त्यांना आकाश ठेंगणं होतं. कारण त्यांचं व्यक्तिमत्व एवढं उत्तुंग होतं की, त्यांच्या कर्तृत्वाची भरारी उंचच उचं होते. अशाच प्रकारे आकाशाला गवसनी घालणारं व्यक्तीमत्व म्हणजे खासदार हेमंत पाटील.

          हे अजब रसायन फक्त बाळासाहेबांच्या शिवसेनेतच मिळू शकतं. कोणताही राजकीय वारसा नसलेली सर्वसामान्य कुटुंबाची त्यांची पार्श्वभूमी. नांदेडच्या सायन्स कॉलेजमध्ये विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून शिकतांना हेमंत पाटील यांनी विद्यार्थी संसद निवडणूक लढवली व ती जिंकून आपण राज्यशास्त्रात पण प्रवीण आहोत हेच दाखवून दिलं. त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील सहकारी म्हणून आम्ही त्यांना जवळून अनुभवलं आहे. त्यांचा शिक्षण, समाजकारण ते राजकरण असा रोमांचक प्रवास आहे. एका कॉलेजच्या विद्यार्थी संसदेचा सचिव, शाखाप्रमुख ते विद्यार्थीसेना जिल्हाप्रमुख, पुढे नगरसेवक ते स्थायी समिती  अध्यक्ष ते जिल्हाप्रमुख, पुढे आमदार आणि आता शिवसेनेत सर्वाधिक मताने निवडून येणारे खासदार अशी त्यांनी स्वतःची ओळख शाखा प्रमुख ते खासदार हा अखंड प्रवास करणारे  कार्यकर्ते म्हणून निर्माण केली.

      देशात लोकसभेचे पडघम वाजू लागले, त्यावेळी अनेक पक्षांची लोकं कोलांट उड्या मारून पक्ष बदलू लागले. नांदेडसह हिंगोलीत देखिल हे सुरूच होतं. मातोश्रीवर अनेकांनी पक्ष बदलून तिकीट  मागण्यासाठी चपला झिजवल्या. पण त्यांना हे ज्ञात नव्हतं की, तिथे बाळासाहेबांचा  चाणाक्ष छावा असलेल्या उद्धवजींनी, प्रत्येक मतदारसंघाचा अभ्यास अगोदरच  करून ठेवला होता. पक्षप्रमुख  उद्धवजी ठाकरे यांनी हिंगोली लोकसभेसाठी योग्य व्यक्तीची शोध मोहीम सुरू केली. त्यासाठी त्यांनी हिंगोली लोकसभेतील स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. त्यातून पहिलं नाव पुढे आलं. नांदेड दक्षिण मतदारसंघात अवघ्या साडेचार वर्षात 388 कोटींचा विकास निधी खेचून आणून मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलणारे, कारकिर्दीच्या सुरवातीपासून शिवसेनेसोबत तब्बल 28 वर्ष एकनिष्ठ असणारे हेमंत पाटील ....आणि उद्धवजींनी हेमंत पाटील यांचे तिकीट फायनल केले.

        हिंगोली लोकसभा मतदार संघ ४५५ किलो मीटर क्षेत्रामध्ये विखुरलेला ... प्रचाराला मिळाले फक्त 23 दिवस ... विरोधकांनी वावड्या उठवल्या, अनेक  आरोप केले. पण शिवसैनिक फक्त आदेशाने पेटून उटणारे ... विरोधकांचा प्रत्येक वार  त्यांनी हाणून पाडला.... हेमंत पाटील या  अजब रसायनाने हिंगोलीतील  अनेक  मातब्बर नेत्यांची मोट बांधण्याची किमया  करीत प्रचाराचा धुरळा उडवायला प्रारंभ केला.... त्यावेळी  त्यांच्या अर्धांगिनी सर्वसामान्यांसाठी झटणारी मुलूख मैदानी तोफ गोदावरी अर्बन  परिवाराच्या अध्वर्यू राजश्री पाटील यांनी अवघ्या 23 दिवसात शिवसैनिकांच्या ने 736 सभा घेऊन प्रचारात आघाडी मिळवली. यातूनच विजयाचा संकल्प  निश्चित झाला...... मतदारांनी झोळी फाटेल इतकं 5 लाख 88 हजारांचं दान देऊन शिवसेनेत सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा आशीर्वाद  दिला. सामान्य कुटुंबाची आणि सर्वसामान्य माणसाची जोडलेली नाळ असलेला खासदार म्हणून हेमंत पाटील यांनी आपली ओळख पक्की केली. आपल्या मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न स्थानिक पातळीवर सुटावेत यासाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघात एकेक जनसंपर्क कार्यालय सुरू केले. असे करणारे ते देशातील एकमेव खासदार असावेत. प्रत्येक विधानसभेसाठी जनसंपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.  एवढ्यावरच ते थांबले नाहीत , तर याहीपुढे जाऊन त्यांनी जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी जनता दरबारांचा धुमधडाका सुरू केला. मतदारसंघातील 11 तालुक्यात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविले आणि कृतज्ञता म्हणून आलेल्या सर्व लोकांना रसाळी जेवण दिले. पाहता पाहता पहिल्या अधिवेशनाची सुरुवात झाली. खासदार हेमंत पाटील यांनी मतदारसंघातील प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. 

*अधिक पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान भरपाई द्यावी. *हिंगोली मध्ये स्वतंत्र आकाशवाणी रेडिओ सेंटर. *पीकविम्याची मागणी. 

*मॉडेल कॉलेजची मागणी. 

*आयुष हॉस्पिटल. *हळद प्रकिया उद्योगाची मागणी. *केंद्रीय विद्यालयाची मागणी. अश्या मतदारसंघातील 95 ठळक व महत्वपूर्ण मागण्या अवघ्या एका वर्षांच्या कारकिर्दीत केल्या व त्यापैकी बहुतांशमागण्या पूर्ण करून देखिल घेतल्या. हिंगोली-कळमनुरी येथील भूकंप असो की किनवट तालुक्यातील शिवणी परिसरात भूगर्भातून आलेले गुढ आवाज, तिथे सर्वात जलदगतीने पोहचून सर्वासामान्य नागरिकांना धीर देण्याचे काम नेहमीच खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे.

   हिंगोली जिल्ह्यातील रस्त्यासाठी 23 कोटी 39 लाखांचा निधी मंजूर करून घेतला. कें द्र सरकार कडून झालेल्या खताच्या भाववाढीवर आवाज उठवून सबसिडी 500 रुपयावरून 1200 रुपये करण्यास भाग पाडले.
      दिवंगत सासूमाई पुष्पाताई महल्ले यांच्या तेरवीवर होणारा अनाठायी खर्च टाळून कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकां करिता अन्नदानाचा " शिदोरी " उपक्रम सुरु केला . जगात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना 
प्रादुर्भावात देशासह राज्यातील राजकीय 
पुढारी घरून सूचना देत असतांना खासदार 
हेमंत पाटील यांनी मतदारसंघातील सर्व 
प्रशाकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या व योग्य त्या सूचना केल्या. एवढ्यावरच न थांबता मतदारसंघातील 11 तालुक्यातील 
प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे तसेच कोविड केअर सेंटर यांना भेटी देऊन तेथिल परिस्थितीचा आढावा घेतला. तिथे आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधांची माहिती घेतली, त्या कुठून ? कशा ?  उपलब्ध करून घ्यायच्या ते ठरवलं. हिंगोलीत केंद्रिय आयुष मंत्रालयाकडून 30 खाटांचे आयुष रुग्णालय मंजूर करून घेतलं. उमरखेड येथे ऑक्सिजन युक्त 30 खाटांचे कोविड केअर सेंटर एका महिन्यात उभारले. कळमणूरी येथील रुग्णालयात आरओ प्लँट व जनरेटर बसविण्यास प्रशासनाला भाग पाडून शुद्ध पाण्याचा व विजेचा प्रश्न मिटविला. उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे स्वतंत्र फिडर उपलब्ध करून 24 तास विज उपलब्धतेची व्यवस्था केली. राज्य आपत्ती निधीतून हिंगोली जिल्हा व उमरखेड -वसमत विधानसभा मतदार संघात ऑक्सिजन पुरवठा, रेमडीसीवर इंजेक्शन व प्रतिबंधात्मक लसींच्या पुरवठ्यासाठी राज्य आपत्ती निधीतून 5 कोटी निधी उपलब्ध करून घेतला. जनतेला संयम,नियमांचे पालन आणि आरोग्याची काळजी घेण्याविषयी जनजागृती केली . कोरोनामुळे सुरू झालेल्या संचारबंदीमध्ये मराठवाड्यातील व विदर्भातील पुणे-मुंबई -नाशिक येथे अडकलेल्या नागरिकांसाठी पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरें व परिवहन 
मंत्री अनिल परब यांच्या शिवशाही बसची मागणी केली आणि येथे अडकलेल्या शेकडो नागरीकांना सुखरूप आपल्या घरी पोहचण्याची व्यवस्था करून दिली. मतदारसंघातील मॉरिशस येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना मदत पोहचवली. तसेच अनेक राज्यात अडकलेल्या नागरिकांना तेथील स्थानिक पातळीवर जमेल तशी राहण्याची व भोजनाची व्यवस्था उपलब्ध करून दिली. मतदारसंघातील दिव्यांग बांधवांसाठी मोफत साहित्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर दिव्यांग मोजमाप तपासणी शिबीराचे आयोजन केले. सद्यस्थिती मध्ये सर्व कॅम्प झाले व साहित्यही वाटप झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 

दिव्यांग बांधवाना 5% राखीव निधी देण्यात यावा यासाठी हिंगोली, नांदेड व यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना 
सूचना दिल्या आहेत. मतदारसंघातील शिवभोजन थाळीची संख्या वाढवून गरजू लोकांना आधार देण्याचं काम खासदार हेमंत पाटील यांनी केलं. खासदार हेमंत पाटील यांनी दोन वर्षात आपल्या कारकीर्दीमध्ये आपल्या लोकसभा मतदारसंघात अनेक कामे मार्गी लावली आहेत.  किनवट तालुक्याकडेही त्यांचं विशेष लक्ष आहे. औंढा-नागनाथ येथील दगडफेकीत जखमी पोलिसांना भेट देऊन त्यांनी विचारपूस केली. उमरखेड जवळ पुराच्या पाण्यात बस वाहून गेली त्यावेळी सर्वप्रथम घटनास्थळी हजर राहून मयतांना बाहेर काढण्यास प्रशासनाला भाग पाडले. त्यांच्या वारसांना तातडीने मदत मिळवून देण्यास पुढाकार घेतला. ओल्या दुष्काळाने उद्धवस्त झालेल्या पिकांची पाहणी थेट बांधावर जाऊन केली. त्यांना दिलासा तर दिलाच ; परंतु मदतीसाठी शासनाला हलविले. वसमतचं छत्रपती शिवराय पुतळा प्रकरण अत्यंत सयंमानं हाताळलं.  विदर्भ मराठवाड्याची सिमारेषा असलेल्या पैनगंगा नंदीवर अनेक ठिकाणी पुलं बांधकामास मंजुरी मिळविली.हिंगोली लोकसभा मतदार संघातील जलसिंचन प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी राज्यपाल महोदयांची भेट घेतली. एवढ्यावरच न थांबत त्यांनी थेट महामहीम राष्ट्रपती महोदयांना भेदून निवेदन दिले. तेलंगाणा , विदर्भ सिमेवर असलेल्या  किनवट तालुक्यातील राजगड येथे विमानतळ करण्यासाठी त्यांचा पाठपुरावा चालू आहे.

     मतदार संघातील थोर, मोठा व्यक्तीच नव्हे तर सर्वसामान्यातील कुणीही कोरोनाने अथवा वृद्धापकाळाने दगावल्यास त्यांच्या घरी जाऊन कुटूंबियांचे ते सांत्वन करतात. आपले जुने मित्र असो अथवा राजकीय विरोधक त्यांच्याही घरी जाऊन वडीलधाऱ्या मंडळीची ते आस्थेवाईकपणे विचारपूस करतात व आशीर्वाद घेतात. जनहितासाठी सदैव भ्रमंती करण्या या लोकनेत्यास भावी कार्यासाठी व दीर्घायुरोग्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

-उत्तम कानिंदे,
स्तंभलेखक ,
किनवट (नांदेड )

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News