महाराष्ट्रातील राजभवन एक ऐतिहासिक वास्तू - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, June 9, 2022

महाराष्ट्रातील राजभवन एक ऐतिहासिक वास्तू

 



मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मुंबई राजभवन हे महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान आहे. मुंबई शहरातील ती एक अतिशय सुंदर वास्तू आहे. राजभवन अंदाजे ऐकोणपन्नास एकर जमिनीवर वसलेले आहे व त्याच्या तीनही बाजूंना समुद्र आहे. मलबार हिल येथील राजभवन संकुल हे मैलभर लांब असलेली दाट वने, वाळुचे समुद्र किनारे आणि अनेक प्रकारच्या टवटवीत हिरवळीने व्यापले आहे.मुंबईच्या राजभवनाची अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट ही आहे की ते दीड शतकांपासून इतिहासाची साक्षीदार आहे. 


महाराष्ट्राचे राज्यपाल हे महाराष्ट्र राज्याचे संविधानिक प्रमुख असून ते ते भारतीय संविधानानुसार विनिर्दिष्ट केलेल्या अधिकारांचा वापर करतात. राज्यातील विद्यापीठांचे राज्यपाल हे पदसिध्द कुलपती आहेत. विविध क्षेत्रांच्या विकासाच्या दृष्टीने संविधानाच्या अनुच्छेद 371 (2) अन्वये राज्यपालांना विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे. तसेच संविधानाच्या अनूसूची पाच अन्वये राज्यपालांना अनुसूचित क्षेत्रांच्या प्रशासनाबाबत देखील विशेष जबाबदारी आहे.


महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी साहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणातील व देशातील सर्वात चर्चित व लोकप्रिय राज्यपाल आहेत असे म्हटले तर वावगे  ठरणार नाही. राजभवनातील जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर सरांचा उत्साह व राजभवनातील उपस्थीत सर्व पाहुण्याचा केलेला आदर सत्कार पाहून आम्ही पाहुणे मंडळी स्तंभितच झालो.

प्रसंग होता सर्व सामान्य जनतेला राजभवनातील ऐतिहासिक वास्तूची ओळख व्हावी. निसर्ग रम्य व अतिसुंदर, विशाल सागराला पाहत सुर्योदयाचा रमणीय प्राकृतिक सौंदर्य पाहण्यासाठी सर्व सामान्य जनतेलाही खुले असलेले राजभवन सहकुटुंब पाहण्याचा योग आला. 


दरवाजे व शोभिवंत फ्रेंच शैलीच्या खुर्च्या व सुंदर प्रतिमा असलेले सोफे यांचा मौल्यवान संग्रह आहे.विविध सभागृहात ज्या ठिकाणी शपथ विधी कार्यक्रम व राज्यातील अतिविशिष्ट घटना घडतात अशी विस्तीर्ण दालणे, (उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पहाटेचा ऐतिहासिक शपथविधी सभागृह) पुरातन मंदिर, 2016 साली उत्खननात सापडलेल्या तोफा, भुयारी रस्ते, राजभवनाला भेट देणाऱ्या अभ्यागतांना या इमारतींचा इतिहास व येथे ठेवलेल्या काही वस्तूंबाबत नेहमीच उत्सुकता असते. हे दालन कला व इतिहासावर प्रेम करणाऱ्यांसाठी मौल्यवान असेल.राजभवन परीसरात मोरांचा स्वच्छंद वावर असतो अशी माहिती जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर साहेबांनी दिली. ब्रिटिश काळापासून ते आजपर्यंतच्या राज्यपिलाचा इतिहास व त्यांची कारकीर्द मुखोद्गगत आसलेले जन संपर्क अधिकारी उमेश काशीकर हे खऱ्या अर्थाने जनसंपर्क अधिकारी वाटत होते. कारण मंत्रालय व महापालिका व इतर आस्थापनांतील जनसंपर्क अधिकारी कधीच शक्यतो सर्व सामान्य जनतेला शक्यतो सापडत नाही. नेहमीच अधिकारी व पत्रकारांच्या संपर्कात असलेल्या जनसंपर्क अधिकार्यांची वाणवा राज्यपालांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांने आज मात्र दूर केली. राजभवन म्हणजे राज्यातील उलथापालथचे सत्ता केंद्र. परंतु महाराष्ट्रातील राजभवन मात्र खऱ्या अर्थाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी साहेबांच्या आगमनाने जनतेला आपलेसे वाटू लागले. आम्हा सर्व सामान्य जनतेलाही राजभवनातील सभागृहात कोविड योद्धा पुरस्कार देताना, पुस्तकांचे प्रकाशन करताना, तर कधी कधी विशेष पुरस्कार देतांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी प्रसार माध्यमांतून दिसू लागले. राज्यपालांच्या राजकीय भुमिकेबद्दल आमच्यासारख्या सर्व सामान्य जनतेला विशेष रस नाही. अशा या ऐतिहासिक वास्तूचे नुतनीकरण करण्यात येत आहे. भारतचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जुन महिन्यात राजभवनातील नुतनीकरण करण्यात आलेल्या वास्तुंचे उद्घाटन होणार आहे. 



राजभवनाचा परिसर समुद्रकिनाऱ्यापासून जमिनीपर्यंतच्या उंचसखल जागेवर पसरलेला आहे. एकोणपन्नास एकरावर घुमटाकार जंगल कडा, समुद्र व वाळू आहे. राजभवन हे इतिहासाची अभिव्यक्ती असून महाराष्ट्राचा व भारताचा अभिमानास्पद वारसा आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News