*'फादर्स डे'चे औचित्य साधून अशोक चव्हाण यांची महत्त्वपूर्ण घोषणा* *डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या सिंचन क्षेत्रातील योगदानावरील माहितीपट 'जलनायक'चे लवकरच लोकार्पण* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, June 20, 2022

*'फादर्स डे'चे औचित्य साधून अशोक चव्हाण यांची महत्त्वपूर्ण घोषणा* *डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या सिंचन क्षेत्रातील योगदानावरील माहितीपट 'जलनायक'चे लवकरच लोकार्पण*

मुंबई : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी 'फादर्स डे'चे औचित्य साधून महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यांचे वडिल, माजी केंद्रीय गृहमंत्री व राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व.डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या सिंचन क्षेत्रातील योगदानावर आधारित माहितीपट 'जलनायक'चे लवकरच लोकार्पण होणार असल्याचे त्यांनी ट्वीट करून जाहीर केले आहे. 


२०२०-२१ हे वर्ष जलक्रांतीचे जनक कै.डॉ.शंकरराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष होते. या वर्षाचे औचित्य साधून डॉ. शंकरराव चव्हाण प्रतिष्ठान आणि चित्रायण एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जलनायक- डॉ. शंकरराव चव्हाण’ या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यातून त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत पडणार आहे. अशोक चव्हाण यांच्या सुविद्य पत्नी सौ. अमिता चव्हाण यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या या माहितीपटाचे दिग्दर्शन युवा प्रतिभाशाली दिग्दर्शक अजिंक्य म्हाडगुत यांनी केले आहे. अशोक चव्हाण यांच्या कन्या सुजया व श्रीजया सहनिर्मात्या आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News