नांदेड जिल्ह्यात 15 व्यक्ती कोरोना बाधित तर 11 बाधितांना बरे झाल्याने सुट्टी # आज माहूरचे 5 बाधित आढळले - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, July 17, 2022

नांदेड जिल्ह्यात 15 व्यक्ती कोरोना बाधित तर 11 बाधितांना बरे झाल्याने सुट्टी # आज माहूरचे 5 बाधित आढळले

 



नांदेड (जिमाका) ता.17 : जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या  200 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, लोहा 1, धर्माबाद 1, मुदखेड 1, हदगाव 1, मुखेड 3, कंधार 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे माहूर 5 असे एकूण 15 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 19 एवढी झाली असून यातील 1 लाख 279 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 48 रुग्ण उपचार घेत आहेत.


        जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 5 व नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गंत गृह विलगीकरणातील 6 असे एकूण 11 रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 25, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 20, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, अश्विनी हॉस्पिटल 2 असे एकुण 48 व्यक्ती उपचार घेत आहेत.


जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.


एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 10 हजार 961


एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 90 हजार 590


एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 3 हजार 19


एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 279


एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692


उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.34 टक्के


आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-4


आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1


आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक


रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-48


आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News