शिंदेसाहेब,आमच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला याल का...? -हेरंब कुलकर्णी (कविता) - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, September 7, 2022

शिंदेसाहेब,आमच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला याल का...? -हेरंब कुलकर्णी (कविता)

 



शेती माझी उजाड झाली,

नवऱ्याने मग घेतला फास

रोजचीच मग चिंता आहे

कसा घालू लेकरांना घास

उजाड शेत,भकास संसार

भेट तुम्ही द्याल  का ?

आमच्या घरी दर्शनाला

शिंदेसाहेब याल का ?


पुरात माझी शेती गेली

स्वप्न माझं पाण्यात गेलं

सावकाराचं कर्ज फक्त

यावर्षी दुप्पट झालं

अश्रू आमचे पुसायला 

आता तरी याल का ?

आमच्या घरी दर्शनाला

शिंदेसाहेब याल का ?


भटके आम्ही पालावरचे 

गावोगावी भटकत आहे

व्यवस्थेच्या फासात आमच्या

पिढयान पिढया अडकत आहे

अंधाऱ्या आमच्या पालावर

लाल दिवा घेऊन याल का ?

आमच्या घरी दर्शनाला

शिंदेसाहेब याल का ?


उद्धवना सोडून रोजगारासाठी

तुमच्या मागे फिरतो आहे

जगण्याची सारी  लढाई

रोज साहेब हरतो आहे 

दहीहंडी सारखे आरक्षण

गणेश मंडळांना द्याल का..?


आम्ही कुणी मंत्री नाही

आमदार किंवा नेता नाही 

तुम्ही आले म्हणून त्याची

बातमी काही होणार नाही

तरीसुद्धा आमच्या घरी

थोडा वेळ द्याल का..?

आमच्या घरी दर्शनाला

शिंदेसाहेब याल का ?


 -हेरंब कुलकर्णी

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News