गुरुवर्य एम.पी.भवरे स्मृती पुरस्कारांची घोषणा : दिग्दर्शक अभिनेता एस.व्ही रमणाराव, हास्यसम्राट सिद्धार्थ खिल्लारे, पत्रकार रामचंद्र देठे यांचेसह २० व्यक्ती सन्मानित होणार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, September 11, 2022

गुरुवर्य एम.पी.भवरे स्मृती पुरस्कारांची घोषणा : दिग्दर्शक अभिनेता एस.व्ही रमणाराव, हास्यसम्राट सिद्धार्थ खिल्लारे, पत्रकार रामचंद्र देठे यांचेसह २० व्यक्ती सन्मानित होणार

 



नांदेड ता.११ : सन २०२१/२०२२ वर्षाचे  गुरुवर्य एम.पी. भवरे स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार घोषित करण्यात आल्याची माहिती बहुजन टायगर फोर्सचे संस्थापक अध्यक्ष  त्रिरत्नकुमार भवरे यांनी दिली आहे. पुरस्कार निवड समितीचे सिनेअभिनेता डाॅ. प्रमाेद अंबाळकर , डाॅ.पी.बी.नामवाड , यशवंत थाेरात यांनी पुरस्कार घाेषित केले.


   घोषित केलेले पुरस्कार व्यक्ती पुढीलप्रमाणे आहेत. : अभिनेता दिग्दर्शक एस.व्ही. रमणाराव (राज्यस्तरीय सेवा गौरव), हास्यसम्राट-झी टीव्ही स्टार सिद्धार्थ खिल्लारे (उत्कृष्ट कला गौरव) , पत्रकार तथा निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे (पत्र भूषण), स्वियसहाय्यक जि.प.बालाजी नागमवाड(सेवा गौरव), समाजसेविका  विजया काचावार ((सेवा गौरव), विस्तार अधिकारी प.स.लोहा डी. आय. गायकवाड (सेवा गौरव), समाज कल्याण निरिक्षक श्रीमती एस. जी. वागतकर (सेवा गौरव), जिल्हा कार्यक्रम अधिकारी जि.प. मिलिंद व्यवहारे (सेवा गौरव), समतादूत दिलिप सोंडारे(सेवा गौरव) , समाज सुधारक कैलास गायकवाड (सेवा गौरव), वनाधिकारी श्रीकांत जाधव (कर्तव्यदक्ष अधिकारी), वनाधिकारी अनिल रासने (कर्तव्यदक्ष अधिकारी), सपोनि बी.जी.महाजन (कर्तव्यदक्ष अधिकारी), वनाधिकारी एस.डी.हराळ (कर्तव्यदक्ष अधिकारी) , कृषी अधिकारी पुंडलिक माने (कर्तव्यदक्ष अधिकारी), मुख्याध्यापक सरसम गजानन सुर्यवंशी (आदर्श मुख्याध्यापक), सहशिक्षक समाधान सुर्वे (आदर्श शिक्षक), वनपाल अण्णासाहेब वडजे (सेवा गौरव) , सहशिक्षक गोपाल तुमल्लवार (आदर्श शिक्षक), वनपाल अमोल कदम (सेवा गौरव).

          सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते  गौरव करण्यात येणार आहे. पोटा बु. ता. हिमायतनगर येथे रविवारी (१८ सप्टेंबर )  आयोजित लोककलावंत शाहीर मेळाव्यात पुरस्कार वितरण करण्यात येणार आहेत. असेही  त्रिरत्नकुमार भवरे यांनी सांगितले.

        या साेहळ्याचे स्वागताध्यक्ष बालाजी राठोड, रफीकभाई शेठ, निमंत्रक कैलास भाऊ माने पोटेकर हे आहेत , तर हा साेहळा यशस्वी व्हावा म्हणून  लक्ष्मणराव मा.भवरे , डॉ,मनोज राऊत, यशवंत थोरात, किरण वाघमारे, शाहीर नागोराव मेडेवाड, शिवाजी डोखळे, अविनाश कदम, जळबा जळपते, परमेश्वर वालेगावकर, केशव माने, प्रकाश कदम, गौतम राऊत, शेख खय्युम, नागनाथ वच्छेवाड, शाहीर गाडगे , बापुराव कदम , शाहीर पांडुरंग हापसेवाड, शेषेराव थावरा, रमेश नारलेवाड, किशनराव ठमके, नरेंद्र दोराटे, राहुल लोणे, रमेश कांबळे सरसमकर, जयभीम पाटील, लोकेश कावळे उमरीकर , प्रशांत विनायते यांच्यासह अनेक कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत.  किनवटचे  उत्तम कानिंदे हे सूत्रसंचालन करणार आहेत. असेही संयाेजक त्रिरत्नकुमार भवरे यांनी सांगितले.

         

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News