" माता सुरक्षित तर घर सुरक्षित " अभियान भोकर येथे सुरुवात - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, September 26, 2022

" माता सुरक्षित तर घर सुरक्षित " अभियान भोकर येथे सुरुवात



भोकर : महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, नांदेड जिल्हा आरोग्य विभाग यांच्या वतीने " माता सुरक्षित तर घर सुरक्षित " हे अभियान ता. २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर नवरात्रोत्सव करण्यात येणार आहे. आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर ग्रामीण रुग्णालय भोकर येथे रुग्ण कल्याण समितीचे सदस्य डॉ. साईनाथ वाघमारे यांच्या हस्ते मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.

          " माता सुरक्षित तर घर सुरक्षित " या अभियान विषयी माहितीचे वाचन आरोग्य पर्यवेक्षक सत्यजीत टिप्रेसवार यांनी केले व वैद्यकीय अधीक्षक डॉ अशोक मुंडे यांनी आरोग्याबाबत महिलांना मार्गदर्शन केले.

         आज ग्रामीण रुग्णालय भोकर येथे महिलांची तपासणी करण्यात आली. सदरिल अभियानात १८ वर्षावरील सर्व महिला, माता, गरोदर स्रीया यांची संपूर्ण वैद्यकीय आरोग्य तपासणी (बी.पी., शुगर, दंतचिकित्सा व रक्तक्षय) तसेच कर्करोग स्क्रिनिंग, रक्तदाब स्क्रिनिंग, मधुमेह स्क्रिनिंग (३० वर्षावरील सर्व महिला ), माता व बालकांचे लसीकरण, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा देण्यात आल्या.


         यावेळी ग्रामीण रुग्णालय भोकर येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. सारीका जावळीकर, पांडुरंग तम्मलवाड, आरोग्य कर्मचारी नामदेव कंधारे , मुक्ता गुट्टे, संगीता पंदिलवाड, आरोग्य सेविका सरस्वती दिवटे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News