भोकर येथे आरोग्य व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, September 26, 2022

भोकर येथे आरोग्य व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

 



भोकर : डॉक्टर असोशिएशन व केमिस्ट्र असोशिएशन आणि ग्रामीण रुग्णालय  यांच्या संयुक्त विद्यमाने स्मृतीशेष प्रवीण वाघमारे यांच्या सातव्या पुण्यस्मृती दिनानिमित डॉ. साईनाथ वाघमारे यांच्या यश हॉस्पिटल  येथे मोफत  अंडवृद्धी, हर्निया, अंपेडिक्स व शरीरावरिल गाठी असणाऱ्या रुग्णांची आरोग्य तपासणी ता.२५ सप्टेंबर रोजी करण्यात आली. या शिबीरात निवड झालेल्या रुग्णांची शस्त्रक्रिया ग्रामीण रुग्णालय भोकर येथे ता. २६ सप्टेंबर रोजी शत्रक्रिया करण्यात आली.

         या शिबिरात ६ अंडवृद्धी, ४ हर्निया, २ अपेंडीक्स  व १५ रुग्णांच्या शरीरावरील गाठीच्या मायनर शत्रक्रिया करण्यात आल्या. वरील शत्रक्रिया शिबिरात  ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.अशोक मुंडे यांच्या मार्गर्शनाखाली, सर्जन डॉ.जीवन पावडे नांदेड, डॉ. संतोष अंगरवार , डॉ. सुरेश, डॉ.  उत्तम वागतकर  यांनी शस्त्रक्रिया केल्या. या शिबिरात भूलतज्ज्ञ डॉ. अस्मिता भालके, डॉ. बाळासाहेब बिऱ्हाडे यांचे सहकार्य मिळाले. तसेच शस्त्रक्रिया गृहात  सुचिता नवघडे परिसेविका, जीजा भवरे, मंगल भोसले अधिपरिचारिका, मुक्ता गुट्टे, सरस्वती दिवटे आरोग्य सेविका, बबलू चरण, शिंदे, सेवक यांनी काम केले.



          शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी बालाजी चांडोळकर , अत्रिनंदन पांचाळ, मनोज पांचाळ, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी झाहेद अलि, सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य पर्यवेक्षक, पांडुरंग तम्मलवाड, नामदेव कंधारे आरोग्य कर्मचारी, सुधाकर गंगातीरे आरोग्य मित्र तसेच हत्तीरोग नियंत्रण उपपथक भोकर व किनी येथील व्यंकटेश पुलकंठवार, दत्तात्रेय ढाले आरोग्य सहाय्यक, विठ्ठल मोरे, इंदूरकर आरोग्य कर्मचारी, रामराव जाधव,गणेश गोदाम, राजू चव्हाण, ज्ञानेश्वर खोकले, इंदल चव्हाण,मारोती गेंदेवाड क्षेत्र कर्मचारी आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले .

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News