वैचारिक शुद्ध होण्यास त्रीसरण व पंचशी लाचे आचरण करावे - अभि. एम. एम. भरणे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, September 29, 2022

वैचारिक शुद्ध होण्यास त्रीसरण व पंचशी लाचे आचरण करावे - अभि. एम. एम. भरणे

 



परभणी : माणसांने प्रथम शुद्ध व्हावे म्हणजे मनातील मार व विकार नष्ट करुन  दैववाद व अंधश्रद्धेचे निर्मूलन करून वैचारिक शुद्ध व्हावे. यासाठी त्रिसरण व पंचशीलाचे आचरण करावे तेव्हाच माणसाला सदाचाराचा धम्म मार्ग सापडतो.  म्हणून माणसाने शुद्ध होऊन जीवन जगावे असे प्रतिपादन बौध्दाचार्य अभि. एम. एम. भरणे यांनी  केले.

        ते गुरुवारी (ता. 29 ) ते सुजातानगर येथील वर्षावास कार्यक्रमात धम्म प्रवर्चन देतांना बोलत होते. यावेळी त्यांनी शुद्ध, विशुद्ध, परिशुद्ध या विषयावर धम्म प्रर्वचन दिले. भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका मिराताई आंबेडकर यांनी वर्षावास कार्यक्रमा निमित प्रवचन मालिकेचे आयोजन केले  आहे. त्या निमित्त  विविध नगरात ते धम्म प्रवचन करीत आहेत.

           येथील सुजाता कालनीत सुजाता महिला मंडळाच्या वतीने  आषाढ पौर्णिमे निमित्त ता. 13.07.22 पासून वर्षावास कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला आहे.

दररोज दुपारी 2.00 वाजता भ. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन  बुद्ध विहारात पुज्य धम्मशीला आर्याजी ह्या करीत आहेत.

         या प्रसंगी प्रथम उपस्थित सर्वांनी  सम्यक सम्बुद्ध व राष्ट्रनिर्मिते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले व सामुहिक  त्रिसरण पंचशील घेतले.  यावेळी सुवर्णमाला गायकवाड, गयाबाई झिंझाडे, सुनिता पनाड, आशा साबळे, प्रभावती मोरे, आशामती प्रधान, शकुंतला मगरे, गयाबाई खरात, वच्छला शिवभगत , शांताबाई जोंधळे, करुणा साळवे, मंगला भक्ते, वर्षाताई साळवे, रेखा रगडे, छाया वहिवाळ, अनुसया इंगोले, सुनिता जगताप, कुमुदिनी शेळके, मीनाताई सरोदे, कमलताई मगरे, विमल उबाळे, नंदा वाव्हवळ, सीमाताई घनसावंत  इत्यादींसह बहुसंख्य महिला व उपासक उपस्थित होते. बौद्धाचार्य भानुदास साबळे  यांनी आभार प्रदर्शन केले. शेवटी सरणतय घेऊन कार्यक्रम संपन्न झाला.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News