नांदेड जिल्ह्यात 160 गायवर्ग पशुधन लम्पी बाधित ▪️2 लाख 87 हजार 858 पशुधनाचे प्रागतिक लसीकरण - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, September 28, 2022

नांदेड जिल्ह्यात 160 गायवर्ग पशुधन लम्पी बाधित ▪️2 लाख 87 हजार 858 पशुधनाचे प्रागतिक लसीकरण

 


 

नांदेड (जिमाका) ता. 28 : नांदेड जिल्ह्यात लम्पी बाधित पशुधनाची संख्या (गाय वर्ग) 160 एवढी झाली असून जिल्हा प्रशासनातर्फे लसीकरणावर अधिक भर दिला आहे. बुधवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी संपूर्ण जिल्हाभर लसीकरणावर नियोजनबद्ध भर देऊन आज रोजी 38 हजार 675 एवढ्या पशुधनाचे लसीकरण करण्यात आले. आजवर जिल्ह्यात एकुण 2 लाख 87 हजार 858 पशुधनाचे प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे.

 

लम्पी हा आजार गोठ्यातील अस्वच्छता, पशुधनाच्या अंगावरील गोचिड व इतर किटकांमुळे होण्याचा संभव अधिक असतो. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे ग्रामपातळीवर जाऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.

 

आजच्या घडीला नांदेड जिल्ह्यातील 42 गावे लम्पी बाधित आहेत. या 42 गावातील एकुण गाय वर्ग पशुधन हे 19 हजार 957 एवढे आहे. यातील 160 बाधित पशुधनाला वेगळे काढून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. बाधित गावाच्या 5 किमी परिघातील गावांची संख्या 270 एवढी आहे. एकुण गावे 312 झाली आहेत. या बाधित 42 गावांच्या 5 किमी परिघातील 312 गावातील (बाधित 42 गावांसह) एकुण पशुधन संख्या ही 87 हजार 980 एवढी आहे. लम्पीमुळे मृत पशुधनाची संख्या 10 एवढी झाली आहे. उपलब्ध लस मात्रा 3 लाख 78 हजार एवढी असून पशुपालकांनी घाबरून न जाता आपल्या पशुची स्वच्छता, गोठ्यातील स्वच्छता व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले आहे.

 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News