लताताई उमरेकर हीची जपान येथे होणाऱ्या जागतिक पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय संघात निवड - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, October 21, 2022

लताताई उमरेकर हीची जपान येथे होणाऱ्या जागतिक पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय संघात निवड

  



नांदेड : येथील दिव्यांग खेळाडू लताताई परमेश्वर उमेरकर हीची पॅरा (दिव्यांग) जागतिक बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे, दिव्यांगपणावर मात करत जागतिक स्पर्धेपर्यंत मजल मारणारी नांदेड जिल्हयाची पहिली दिव्यांग शटलर् बॅडमिंटन खेळाडू असून तिने आतापर्यत आंतरराषट्रीय स्पर्धेत ब्राझील आणि दुबई येते दोन कांस्य पदकांची कमाई केली आहे, त्याच बरोबर राष्ट्रीय पातळीवर पाच पदके प्राप्त केली आहेत.

          या जागतिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तिला आर्थिक मदतीची गरज आहे. ह्या स्पर्धा एवढ्या मोठ्या असून देखील शासनाची कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही. लताताईची परीस्थिती हलाखीची असून तरी देखील तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे, भारतीय संघात महाराष्ट्रातून SH6 गोटतून ती  एकमेव खेळाडू आहे.

         जगात मानाच्या स्पर्धा मानल्या जाणाऱ्या (world championship) ही एक स्पर्धा असून त्या तारीख 1 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर 2022  दरम्यान टोक्यो जपान येथे होणार असून, तिला 28 अक्टोबर 2022 रोजी निघायचे आहे . नांदेड जिल्ह्य तूनच नव्हे तर राज्यातून ती एकमेव खेळाडू या स्पर्धेत आपली जागा निश्चित करू शकली. ह्याचा गर्व जिल्ह्याला व राज्याला आणि  दिसून येत नाही, दिव्यांगांच्या ऑलिम्पिक २०२० स्पर्धेत दिव्यांगाणी सर्वात जास्त पदकाची कमाई केली असून तरी पण केंद्र आणि राज्य सरकार दिव्यांग खेळाडू बाबत उदासीन दिसत आहेत.

        ह्या स्पर्धा वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनच्या मान्यतेने होत असून ह्या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी लताताई ला 3.50 लक्ष रुपयाची आर्थिक गरज असून,  तीला समाजातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत करून लताताईला या world championship मोठ्या स्पर्धेत जाण्याची आणि तिच्या पंखांना बळ व वर्ल्ड चॅम्पयनशिपमध्ये मेडल मिळवण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यावे अशी विनंती अंतरराष्ट्रीय पदक विजेती खेळाडू लताताई उमरेकर हिने केली आहे.

        जागतिक पॅरा बॅडमिंटन दिनांक १ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर २०२२ दरम्यान टोक्यो जपान येथे होणार आहेत,

तिच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि तिला आर्थिक मदत करण्यासाठी  

भारतीय स्टेट बँक,  A/C No. 62238707698             

 IFSC- SBIN0020050         

 Branch : Vazirabad Nanded.    

(Mobil no. 9960784967 )


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News