किनवट : राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल किनवट पंचायत समितीतील आरोग्य पर्यवेक्षक विस्तार अधिकारी शिवनंदा चव्हाण यांना जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते बुधवारी नांदेड येथील मेळाव्यात प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या सन्मानाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत.
8 मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त सक्षम महिला सक्षम समाज या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने महिला अधिकारी व कर्मचारी पुरस्कार हा नाविन्यपूर्ण उपक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी सुरू केला असून त्या अनुषंगाने किनवट पंचायत समितीत आरोग्य पर्यवेक्षक विस्तार या पदावर कार्यरत असलेल्या शिवनंदा लक्ष्मण चव्हाण यांनी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल 1 मार्च 2023 रोजी नांदेड येथील ए. के. छत्रपती संभाजी महाराज मंगल कार्यालयात आयोजित महिला अधिकारी व कर्मचारी मेळावा व पुरस्कार वितरण सोहळ्यात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर -घुगे, प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता शेंबाळे, जिल्हा सत्र न्यायालय नांदेडच्या वरिष्ठ न्यायाधीश श्रीमती डी.एन. जैन , अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नीनाताई बोराडे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. संदेश बालचंद जाधव यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किनवट सारख्या ग्रामीण, दुर्गम भागातील आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार प्राप्त करणाऱ्या शिवनंदा चव्हाण या पहिल्या महिला कर्मचारी ठरल्या असून त्यांच्या या सन्मानाबद्दल किनवट तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment