नांदेड : येथील जिल्हा परिषद हायस्कुल वजिराबादच्या परिरक्षक कार्यालय केंद्र क्रमांक 101 व 201 येथे 08 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला.
जिल्हाधिकारी तथा कॉपीमुक्त अभियानचे प्रमुख अभिजित राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, लातूर बोर्डाचे अध्यक्ष व सचिव सुधाकर तेलंग, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिनानिमित्त एक दिवस - महिलांसाठी खास या उपक्रमात परिरक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या सर्व महिलांनी एका दिवसाचा संपूर्ण कार्यभार सांभाळण्याची क्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. पोलीस स्टेशनमधून पेपर आणणे, परीक्षा केंद्रावर पोहोचवणे, उत्तरपत्रिका परत आणणे, त्याला UID स्टिकर लावून पोस्ट ऑफिसमध्ये पेपर पोहोच करण्यापर्यंतच्या क्रिया यात समाविष्ट होत्या. परिरक्षक कार्यालयाचे प्रमुख बालासाहेब कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती एस. पी. कुलकर्णी, श्रीमती एम. बी. जाधव, श्रीमती पी. एम. कुलकर्णी, श्रीमत पी. एच. बसापुरे, श्रीमती बी. व्ही. नारवाड, श्रीमती जे. एच. शिंदे, श्रीमती एस. एम. येनगुलवार, श्रीमती के. एम. थोटे, श्रीमती रजनी चौधरी, श्रीमती के. यु. दीक्षित, श्रीमती एस. पी. भंडारे यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला.
माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी प्रस्तुत उपक्रमास भेट देऊन महिलांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इरफान शेख, ना.सा. येवतीकर, विजय कुऱ्हाडे, शिवशंकर रॅपनवाड आदींनी परिश्रम घेतले.
दहावी बारावीच्या परीक्षेत रनर म्हणून काम करतांना आज मिळालेला अनुभव खूपच चांगला होता. पोलीस स्टेशनमधून प्रश्नपत्रिका आणणे, परीक्षा केंद्रावर घेऊन जाणे, तेथून उत्तरपत्रिका घेऊन येणे आणि त्यास UID स्टिकर लावून पोस्ट ऑफिस मध्ये पोहोच करणे याचा अनुभव दिल्याबद्दल प्रशासनाचे मी आभार मानते.
-कल्पना दीक्षित
No comments:
Post a Comment