किनवट : पथकातील होमगार्ड परीक्षा बंदोबस्तासाठी माहूर तालुक्यातील आष्टा येथे जात असतांना अचानक समोर रानडुक्कर आल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना यवतमाळ मार्गे नागपूरला संदर्भ सेवेसाठी हलविले आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की , सोमवारी (ता.13) किनवट पथकातील खरबी येथील रहिवाशी होमगार्ड शिवाजी ज्ञानेश्वर मिरासे (रा.खरबी ) सनद नंबर 763 परिक्षा बंदोबस्त दुसऱ्या टप्याकरिता पोलीस स्टेशन सिंदखेड येथे ऑनलाईन नंबर आल्याने ते किनवट ते सिंदखेड मोटार सायकलने जाऊन सिंदखेड पोलीस स्टेशनला गेले. तिथे आवक दिली व परीक्षा बंदोबस्त आष्टा येथे लागल्याने रीत सर स्टेशन डायरीवर नोंद करून आष्टा येथे जात असतांना मोटर सायकल समोर अचानक रान डुक्कर आल्याने अपघात झाला. प्रारंभी माहुर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरु असतांना डॉक्टरांनी पुढील संदर्भिय सेवा (उपचार कामी ) यवतमाळ येथे हलविले. तेथे उपचार करून डोक्यात जास्त दुखापत असल्यामुळे यवतमाळ येथील डॉक्टरांनी पुढील उपचारकामी नागपूर येथे पाठविले.




No comments:
Post a Comment