नांदेड : उन्हाची तीव्रता लक्षात घेता जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचा निर्णय घेतल्याचा आदेश जिल्हा परिषदेच्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने निघाल्याने शिक्षक वर्गात समाधान व्यक्त केल्या जात आहे.
विभागीय शिक्षण उपसंचालक, लातूर विभाग, लातूर यांचे दि. २७.०२.२३. रोजीचे पत्र क्रं १५९९ व विविध संघटनांच्या मागणीचे निवेदन यानुसार मागणी केल्या प्रमाणे मार्च २०२३ पासून उन्हाची तीव्रता वाढल्याचे लक्षात घेता नांदेड जिल्हयातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांचे वेळापत्रक बदलण्याबाबत विविध स्तरावरून मागणी करण्यात येत आहे. वरील मागणीचा विचार करता नांदेड जिल्हयातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळा ह्या दिनांक १५.०३.२०२३ पासून पुढील वेळेत भरविण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे.
सोमवार ते शुक्रवार--शाळेची वेळ - सकाळी ०८.३० ते ०१.३० व शनिवार ...शाळेची वेळ सकाळी ०८.३० ते ११.३० आणि मध्यंतर ... मध्यतंरासाठी वेळ १५ मिनीटे ठेवण्यात यावी. दिनांक १५.०३.२०२३ पासून शाळेच्या वेळेत वरील प्रमाणे बदल करण्यात येत असून त्या प्रमाणे तासिकेचे नियोजन शालेय स्तरावरून करण्यात यावे. असा आदेश ( जिपनां/शिअप्रा/प्रा-१-अ/ १८१७ /२०२३ दि.दिनांक: १४ मार्च २०२३ ) जिल्हा परिषद,नांदेडच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्या संयुक्त स्वाक्षरीने निर्गमीत केला आहे. त्यामुळे आता शाळा सकाळी साडेआठ वाजता भरविण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.
.jpg)



No comments:
Post a Comment