किनवट/भोकर (नांदेड) : एका गुन्ह्यातील आरोपींना अटक न करण्यासाठी 3 हजाराची लाच स्वीकारणारा किनवट पोलीस ठाण्यातील बीट जमादार बालासाहेब पांढरे याला नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता. 20) इंजेगाव (ता.किनवट) येथे रंगेहाथ पकडले. तर दुसऱ्या एका प्रकरणात तक्रारदार यांची बहिण व नातेवाईक यांचे विरुध्द दाखल एन. सी. मध्ये मदत करतो आणि तक्रारदार यांच्या बहिणीचे फिर्याद वरून दाखल गुन्ह्यातसुध्दा मदत करतो म्हणुन 25 हजाराची लाच स्विकारतांना आज मंगळवारी (ता. 21) भोकर येथील जमादार सुभाष कदम यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
किनवट : एका गुन्ह्यातील आरोपींना अटक न करण्यासाठी 3 हजाराची लाच स्वीकारणारा येथील पोलीस ठाण्यातील बीट जमादार बालासाहेब पांढरे याला नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता. 20) इंजेगाव येथे रंगेहाथ पकडले.
किनवट तालुक्याच्या इंजेगाव या गावात काही दिवसांपूर्वी दोन गटात वाद झाला होता. या वादानंतर दोन्ही गटाने परस्परविरोधी तक्रारी दिल्या. या प्रकरणात एका गटातील आरोपी व त्याची पत्नी तसेच 2 मुलांना अटक न करण्यासाठी बोधडी बीटचा . जमादार बालासाहेब पांढरे याने 10 हजार रुपये लाचेची मागणी केली. अटकेच्या भीतीने तसेच याप्रकरणात पुढेही मदत करण्याच्या आमिषाने आरोपीने पांडरे याला 10 हजार रुपये देण्याचे कबूल केले. त्यापैकी ५ हजार रुपये 'बयाना ही काही दिवसापूर्वी दिला. त्यानंतर सदर आरोपीने ता.18 मार्च रोजी जमादार पांढरे हा लाच मागत असल्याची तक्रार नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात केली. त्यानुसार लाचलुचपतच्या पथकाने सोमवारी (ता.20) दुपारी इंजेगावात सापळा रचला.
तक्रारदार व जमादार पांढरे यांच्यात 5 हजाराऐवजी 3 हजारात तडजोड झाली. तडजोड मान्य करीत तक्रारदाराकडून 3 हजार रुपयाची लाच घेताना एसीबीच्या पथकाने पांढरे याला जाळ्यात ओढले. लाचप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद झाली नाही. जमादार पांढरे याच्याच आशीर्वादाने इंजेगाव फाटा हे मटका, इतर अवैध धंद्यांचे माहेरघर बनले होते. याच जमादाराच्या कार्यक्षेत्रात काही दिवसांपूर्वी नांदेडच्या एलसीबीने गांजाची झाडे जप्त केली होती. दरम्यान, 4 वर्षापूर्वी दि. 14 जून 2019 रोजी किनवट ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दिलीप तिडके व पोलीस कर्मचारी मधुकर पांचाळ व पांडुरंग बोईनवाड यांना एकर प्रकरणात तब्बल 50 हजाराची लाच घेताना एसीबीने पकडले होते. त्यानंतर पांढरे याच्यावर कारवाई झाली आहे.
भोकर येथील पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यास लाच प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) सापळा रचून पकडले आहे. अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव सुभाष कदम आहे. अशी माहिती एसीबीने मंगळवारी उशीराने दिली आहे.
तक्रारदार पुरुष, वय 32 वर्षे आरोपी सुभाष लोभाजी कदम, वय 56 वर्षे, व्यवसाय नोकरी पोलीस हेड कॉन्स्टेबल/487, पोलीस स्टेशन भोकर, जि. नांदेड रा. हदगाव ता. हदगाव,जि. नांदेड तक्रार प्राप्त ता.20/03/2023 लाच मागणी पडताळणी ता.21/03/2023 लाच स्विकारली ता.21/03/2023 लाचेची मागणी रक्कम रु.25,000/- स्विकारली रक्कम रु.25,000/-थोडक्यात हकिकत यातील तक्रारदार यांचे बहिणीचे व शेजाऱ्यांचे भांडण झाले होते. भांडणानंतर तक्रारदार यांच्या बहिणीने आणि समोरिल पार्टीने एकमेकांविरुध्द पोलीस स्टेशन भोकर येथे क्रॉस तक्रारी दिल्या होत्या. तक्रारदार यांचे बहिणीस मार लागला असुन सुध्दा त्यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन भोकर येथे गुन्हा दाखल न करता फक्त एन.सी.नोंदवून घेतली होती. त्याविरोधात तक्रारदार यांचे बहिणीने वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना भेटून गुन्हा दाखल करण्याची विनंती केली होती. त्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सदर प्रकरणात फेर चौकशीचे आदेश दिले होते.त्यावरून समोरिल पार्टीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला परंतु तक्रारीत दिलेल्या सर्व आरोपीविरुध्द गुन्हा दाखल न करता फक्त चार पुरुष आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे समोरिल पार्टीचे तक्रारीवरून दाखल एन.सी.चे तपासात आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचे बहिण व नातेवाईक यांचे विरुध्द दाखल एन. सी. मध्ये मदत करतो आणि तक्रारदार यांचे बहिणीचे फिर्याद वरून दाखल गुन्ह्यातसुध्दा मदत करतो म्हणुन आरोपी लोकसेवक यांनी रु. 25,000/- लाचेची मागणी केली उपरोक्त लाचेची रक्कम रु.25,000/- सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी लोकसेवक यांनी पंचासमक्ष स्वतः स्विकारली आहे आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेतले असुन पोलीस स्टेशन भोकर, जि. नांदेड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.




No comments:
Post a Comment