स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान" अंतर्गत गोकुंदात वैद्यकीय व दंत महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन संपन्न - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, October 1, 2025

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान" अंतर्गत गोकुंदात वैद्यकीय व दंत महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन संपन्न

 



किनवट : येथून जवळच असलेल्या उप जिल्हा रुग्णालयात राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान व  "स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान" अंतर्गत आदिवासी भागातील भव्य मोफत वैद्यकीय व दंत महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन कार्यक्रमाध्यक्ष आमदार भीमराव केराम यांचे हस्ते नुकतेच संपन्न झाले.

     यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके , सामान्य रुग्णालय नांदेडचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे , रुग्ण कल्याण समितीचे सदस्य गंगन्नानाजी नेम्माणीवार , गोकुळ भवरे, अखिल खान , पत्रकार संघाचे तालुका सचिव बालाजी शिरसाठ , पत्रकार कार्यकर्त्या परवीन बेगम , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. के. पी. गायकवाड , ग्रामीण रुग्णालय माहूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरणकुमार वाघमारे , ग्रामीण रुग्णालय मांडवीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विक्रम राठोड , खान अब्दुल गफारखान नेत्र रुग्णालय मांडवीच्या नेत्र शल्य चिकित्सक डॉ. अंजली पाटील यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.

     उपजिल्हा रुग्णालय गोकुंदाचे वैद्यकीय अधिक्षक दत्ता केंद्रे यांनी प्रास्ताविक केले. आदी कर्मयोगी उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.



" 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर याकालावधीत ग्रामीण भागात 76 शिबीरे झाली असून 49 हजार रुग्णांची तपासणी केली आहे. यात रक्तदाब 9500 , मधुमेह 9500 ' गनीशय , स्तन व मुख कॅन्सरच्या 4000 रुग्णांची व 14000 किशोरवयीन मुलींची तपासणी केली. किनवटला 200 खाटाचं व एक स्वतंत्र स्त्री रुग्णालय मंजूर झाले आहे.

- डॉ. संजय पेरके , जिल्हा शल्य चिकित्सक , नांदेड "


" ग्रामीण जनतेच्या आरोग्यासाठी वैद्यकीय मंडळी धडपडत आहे. ही शिबीरे गोर गरिब रुग्णांच्या आयुष्यात नव संजीवनी आणणारे आहेत. आपल्या ग्रामीण भागात सर्व आरोग्य सुविधा पुरविण्यात आम्ही कटिबद्ध आहोत. तेव्हा रुग्णांनी राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता यांच्या जयंती निमित्त राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गतच्या सर्व शिबीराचा लाभ घ्यावा.

- आमदार भीमराव केराम , किनवट "

     


    चार दिवस चालणाऱ्या या शिबीराच्या पहिल्याच दिवशी 1292 रुग्णांची तपासणी झाली असून 2 ऑक्टोबर रोजी मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.


    शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. अहसान जुबेरी, डॉ. मनोज घडसिंग , डॉ. सुरजकुमार वाकोडे, डॉ. अश्विनकुमार बोमकंटीवार , डॉ. वैजनाथ साठे , डॉ. सुनंदा भालेराव , डॉ. अभिमन्यू केंद्रे , डॉ. शुभम पवार , डॉ. आदित्य बदने , डॉ. स्वाती केंद्रे  आदींसह उपजिल्हा रुग्णालयाचे सर्व वैद्यकीय अधिकारी , तंत्रज्ञ व  कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News