साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे -गजानन गोपेवाड - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, July 19, 2020

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे -गजानन गोपेवाड





थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन -संपादक
           
                 तुकाराम भाऊराव साठे हे अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जात होते. एक समाज सुधारक, लोक कवी, शाहीर आणि लेखक म्हणून ते नावा रुपाला आले; आण्णाभाऊ हे मार्क्‍सवादी आंबेडकरवादी विचाराचे  होते, अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या लहान गावात झाला, अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा, कादंबरी हे साहित्य प्रकार त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळले आहेत; त्यांच्या काही गाजलेल्या कादंबऱ्या वैजंता ( 1961 )टिळा लाविते मी रक्ताचा, डोंगरची मैना माकडीचा माळ, मुरळी मल्हारी रायाची (1959) चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, (1970 )अशी ही सातार्‍याची तर्‍हा (1974 )अलगुज आणि फकिरा ( 1958  ) अल्पशिक्षण असुनही, आण्णाभाऊनी मराठी साहित्याजगतातील लोकवांग्मय, कथा,लोकनाट्य ,कादंबरी, चित्रपट, पोवाडे, लावण्या, तमाशा-वग, गवळण, प्रवास वर्णन असे अनेक लेखन प्रकार हाताळले आहेत; तमाशा या लोकनाट्याला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय अण्णाभाऊ साठे यांनाच जाते. सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी त्यांनी या साहित्य प्रकाराचा उपयोग करुन घेतला. स्वातंत्र्या नंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जनजागृती केली होती; त्यात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो,  गोवा मुक्ती संग्राम असो या चळवळींमध्ये त्यांनी आपल्या शाहिरीतून मोठे योगदान दिले आहे
 " माझी मैना गावाकडे राहिली,
 माझ्या जीवाची होतीया काहिली" 
ही त्यांची अत्यंत गाजलेली लावणी होती. 
            अण्णाभाऊंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशियन भाषेतून भाषांतर करून, पोवाड्यातून रशिया पर्यंत पोहोचवले आहे, रशियन राष्ट्राध्यक्षा कडून त्यांचा सन्मान देखील झाला होता; आण्णा भाऊंनी आपल्या लेखणीमधून 21 कथा संग्रह 30 पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्यात त्यापैकी सात कादंबऱ्यांवर मराठी चित्रपट ही निघाले आहेत,"फकीरा"कादंबरीला 1961 मधे राज्यशासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळालेला आहे; ज्येष्ठ साहित्यिक वि.स.खांडेकर यांनी या कादंबरीचे कौतुक केले होते, कोळसेवाला, घरगडी ,खानकामगार, डोअर किपर, हमाल, रंग कामगार ,मजूर, तमाशातला सोंगाड्या, अशा विविध भूमिका अण्णांनी प्रत्यक्ष जिवनात वठविल्या होत्या; आण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर (मुंबई) झोपडपट्टीत काढले, याच झोपडपट्टीत अण्णा भाऊंच्या एकापेक्षा एक कला कृतींची निर्मिती झाली होती मुंबईत गिरणी कामगारांचे कष्टमय दुःखाचे जीवन तसेच मुंबईच्या झोपडपट्टीत उघडे-वाघडे बकाल जगणे, त्यांच्या जगण्यातील भयान वास्तव त्यांनी पाहिले होते; त्यांचा भुकेकंगालपणा आणि भुकेची आग शांत करण्यासाठी  होणारी ससेहोलपट, अवैध मार्गाचा अवलंब या साऱ्या गोष्टी त्यांनी जवळून अनुभवल्या आणि ते विदारक आणि अद्भुत वास्तव त्यांनी आपल्या साहित्यातून मांडले. शिक्षणा पेक्षा अनुभव हाच मोठा गुरु असतो या गोष्टीची अनुभूती त्यांचे साहित्य वाचताना येते. कामगारांचे संप, मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणा ही त्यांनी अनुभवला होता.1936 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावा खाली येऊन ते कम्युनिस्ट पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते झाले होते
    अण्णाभाऊंनी अन्याया विरुद्ध झगडणाऱ्या महाराष्ट्राच्या परंपरेचे स्मरण करून संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलना साठी उभ्या महाराष्ट्राला प्रेरणा दिली होती, शाहीर अमर शेख यांच्या समवेत त्यांनी काम केले होते; आण्णा भाऊंची निरीक्षण शक्ती अत्यंत सुक्ष्म होती, नाट्यमयता त्यांच्या लेखन शैलीचा आगळा-वेगळा भाग होता ज्या उपेक्षितांच्या जीवनातून आण्णा भाऊनी अनुभूती घेतली त्यातील अनुभव त्यांच्या लेखनातून जाणवतात; आण्णा भाऊंचा शेवटचा काळ मात्र अत्यंत हलाखीत गेलेला आहे, दारिद्र आणि एकाएकी आयुष्य त्यांच्या वाट्याला आले होते; मराठी साहित्य प्रतिष्ठाना कडून त्यांची नेहमी उपेक्षाच झालीय; सुरवाती पासूनच लेखणी प्रस्थापित लोकांच्याच हातात राहीलेली आहे; त्यामुळे साहित्यात देखील एक वर्गाचीच मक्तेदारी आजही दिसून येतेय मराठी व नाट्य संमेलनाच्या आजपर्यंतच्या अध्यक्षांच्या नावाची यादी पाहिली तर ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते; असे बरेच साहित्यीक आहेत की,फक्त पाश्चात्य इंग्रजी साहित्याचे मराठीत भाषांतर केलेले आहे व तीच पुस्तके स्वत: च्या नावे प्रकाशीत करुन मराठी साहित्याचे नावाजलेले साहित्यीक म्हणून प्रसिद्धी करुन घेतलेली आहे;
परंतु अण्णा भाऊंमध्ये लेखणाची व स्वनिर्मितीची कला होती अशा या महान पण नेहमी दुर्लक्षित केलेल्या प्रतिभावंत लेखकाचे शेवटचे दिवस अत्यंत वाईट अवस्थेत गोरेगावच्या सिद्धार्थ नगर मध्ये व्यथित केले होते..!
    अनेक विद्यापीठातून अण्णा भाऊंच्या साहित्यावर अनेक प्रबंध प्रसिद्ध झाले आहेत; त्यांच्या कथा, कादंबर्‍यांची तर केवळ भारतीयच नव्हे तर 22 परकीय भाषांत भाषांतरे झालेली आहेत, हजारो वाचकांनी त्यांच्या कथा कादंबर्‍याची अक्षरशः पारायणे केलीआहेत; त्यांच्या साहित्यातून प्रकट झालेले सर्व सामान्य माणसा विषयीची आंतरिक तळमळ व त्यांच्या सुखदुःखाचे चित्रण करण्याची ओढ वाचकांच्या मनाला भुरळ आजही घालतेच आहे,
           मुंबई नगरी ग बडी बाका l जशी रावणाची दुसरी लंका ll
  वाजतो ग डंका l
      डंका चहूमूलकी ll 
   या शब्दात पठ्ठे बापूराव मुंबई माया नगरीचे वर्णन करतात. तर याच मुंबई नगरीचे वर्णन करताना अण्णाभाऊ लिहितात-
"मुंबईत उंचावरी l
   मलबार हिल इंद्रपुरी ll
  कुबेराची वस्ती तिथ ,सुख भोगती ll परळात राहणारे l रात दिवस राबणारे
  मिळेल ते खाऊन घाम गाळती ll 
              पठ्ठे बापूरावांना मुंबई गर्भ श्रीमंत दिसते, तर अण्णाभाऊंना तीच मुंबई विषम व्यवस्थेची प्रतीक वाटते; अण्णाभाऊंच्या वेगळ्या जीवन दृष्टीचा येथे प्रत्येय येत रहातो; *ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तोलली नसून ती श्रमिकांच्या तळहातावर उभी आहे*' अशी अण्णाभाऊंची विज्ञाननिष्ठ भूमिका होती;
      'जग बदल घालुनी घाव lअस सांगून गेले मला भीमराव ll
     असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर त्यांची निष्ठा होती; अण्णाभाऊ साठे यांचे सारेच लेखन उपेक्षितांच्या बाजूचे आणि त्यांच्या अटी-तटीच्या जगण्यातील संघर्षाचे व अनुभव विश्वाचे प्रखर वास्तव अधोरेखित करणारे आहे....... 
          18 जुलै 1969 रोजी मुंबईच्या चिराग नगरीच्या झोपडपट्टीत अत्यंत हलाखीच्या अवस्थेत अण्णाभाऊ साठे त्यांचा मृत्यू झाला.
       अशा या थोर साहित्यीकाला, बिनीच्या शिलेदाराला त्यांच्या स्मृति दिना निमित्त विनम्र अभिवादन
  
 माझी मैना गावावर राहिली |
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
माझी मैना गावावर राहिली|
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
माझी मैना गावावर राहिली|
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
माझी मैना गावावर राहिली|
माझ्या जिवाची होतिया काहिली ||

ओतीव बांधा | रंग गव्हाला 
कोर चंद्राची | उदात्त गुणांची |
मोठ्या मनाची | सीता ती माझी रामाची |
हसून बोलायची | मंद चालायची |
सुगंध केतकी | सतेज कांती |
घडीव पुतली सोन्याची | नव्या नवतीची |
काडी दवन्याची | रेखीव भुवया |
कमान जणू इन्द्रधनुची |
हिरकणी हिरयाची काठी आंधल्याची |
तशी ती माझी गरीबाची |
मैना रत्नाची खाण | माझा जिव की प्राण |
नसे सुखाला वाण |
तिच्या गुणांची छक्कड़ मी गयिली |
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
माझी मैना......

गरिबीने ताटतुट केलि आम्हा दोघांची |
झाली तयारी माझी मुम्बैला जाण्याची |
वेळ होती ती भल्या पहाटेची |
बांधाबांध झाली भाकर तुकड्याची |
घालवित निघाली मला माझी मैना चांदनी शुक्राची |
गावदरिला येताच कली कोमेजली तिच्या मनाची |
शिकस्त केलि मी तिला हसवण्याची |
खैरात केली पत्रांची | वचनांची |
दागिन्यांन मडवुन काडयाची |
बोली केली शिंदेशाही तोड्याची |
साज कोल्हापुरी | वज्रटिक |
गल्यात माळ पुतल्याची |
कानात गोखरे | पायात मासोल्या |
दंडात इला आणि नाकात नथ सर्जाची |
परी उमलली नाही कली तिच्या आन्तरिची |
आणि छातीवर दगड ठेवून पाठ धरिली मी मुम्बैची |
मैना खचली मनात | ती हो रुसली डोळ्यात |
नाही हसली गालात | हात उन्चावुनी उभी राहिली ||
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
माझी मैना.....

या मुम्बई गर्दी बेकरांची |
त्यात भर झाली माझी एकाची |
मढ़ेवर पडावी मुठभर माती |
तशी गत झाली आमची |
ही मुम्बई यंत्राची, तंत्राची, जागनाराची, मरनारांची, शेंदिची, दाढ़ीची,
हडसनच्या गाडीची, नायलोनच्या आणि जोर्जेटच्या
तलम साडीची | बुटांच्या जोडीची |
पुस्तकांच्या थडीची | माडीवर माडी | हिरव्या माडीची |
पैदास इथे भलतीच चोरांची |
एतखाऊची | शिर्जोरांची |
हरामखोरांची | भांडवलदाराची |
पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची |
पर्वा केलि नाही उन्हाची, थंडीची, पावसाची |
पाण्यान भरल खीस माझ |
वान माला एका छात्रिची |
त्याच दरम्यान उठली चलवल संयुक्त महाराष्ट्राची|
बेलगांव, कारवार, निपानी, गोव्यासह एकभाषिक राज्याची |
चकाकली संगीन अन्यायाची | फ़ौज उठली बिनिवारची |कामगारांची | शेतकरीयांची ।मध्यम वर्गियांची |
उठला मराठी देश | आला मैदानी त्वेष |
वैरी करण्या नामशेष |
गोळी डमडमची छातीवर सहिली |
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
माझी मैना.......
म्हणे अन्नाभाऊ साठे | घर बुडाली
गर्वाची | मी-तू पणाची | जुल्माची | जबरिची |
तस्कराची | निकुम्बलीला कत्तल झाली इन्द्रजिताची |
चौदा चौकड्याच राज्य गेले रावनाचे | लंका जलाली त्याची |
तीच गत झाली कलियुगामाजी मोरारजी देसायाची आणि स.का. पाटलाची |
अखेर झाली ही मुम्बई महाराष्ट्राची |
परलच्या प्रल्याची | लालबागच्या लढायची | फौंटनच्या चढ़ाइची |
झाल फौंटनला जंग | तिथे बांधुनी चंग |
आला मर्दानी रंग | धार रक्ताची मर्दानी वाहिली |
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
माझी मैना....

महाराष्ट्राने गुढी उभारली विजयाची |
दाखविली रित पाठ भिंतीला लावून लढायची |
पारी तगमग थांबली नाही माझ्या अंतरीची
| गावाकडे मैना माझी | भेट नाही तिची |
तीच गत झाली आहे या खंडित
महाराष्ट्राची | बेलगांव, कारवार, डांग, उम्बरगावावर
मालकी दुजांची | धोंड खंडनीची | कमाल दंडलीची | चिड बेकिची | गरज एकीची |
म्हणून विनवणी आहे या शिवशाक्तिला शाहिराची |
आता वलु नका | रणी पलु नका | कुणी चलू नका |
बिनी मारायची अजुन राहिली |
माझ्या जिवाची होतिया काहिली I

-गजानन गोपेवाड, 
अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News