लाँकडाऊनच्या काळात राज्यात कोविड संदर्भात २ लाख २९ हजार गुन्हे २० कोटी ९९ लाख रुपयांची दंड आकारणी ७ लाख ५३ हजार पास - गृहमंत्री अनिल देशमुख - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, August 16, 2020

लाँकडाऊनच्या काळात राज्यात कोविड संदर्भात २ लाख २९ हजार गुन्हे २० कोटी ९९ लाख रुपयांची दंड आकारणी ७ लाख ५३ हजार पास - गृहमंत्री अनिल देशमुख

 


    मुंबई दि १६ -  लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार  २ लाख २९ हजार गुन्हे दाखल झाले आहेत अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

    राज्यात  लॉकडाऊनच्या कालावधीत म्हणजे दि.२२ मार्च ते १५ ऑगस्ट पर्यंत  कलम १८८ नुसार २, २९ ,३५२   गुन्हे नोंद झाले असून ३३,३६१ व्यक्तींना अटक करण्यात आली, यातील विविध गुन्हांसाठी २० कोटी ९९ लाख ७८ हजार ८४४ रु. दंड आकारण्यात आला.  तसेच अत्यावश्यक सेवेसाठी ७ लाख ५३  हजार ०९१  पास  पोलीस विभागामार्फत देण्यात आले.

कडक कारवाई

  कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.  या दरम्यान पोलिसांवर  हल्ला होण्याच्या ३३३ घटना घडल्या. त्यात ८८८ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

१०० नंबर - १ लाख १० हजार फोन

     पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर  १,१०,२२५ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. 

       तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ८२७ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली.  या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३४७ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर ९५,८२१ वाहने जप्त करण्यात आली.

पोलिस कोरोना कक्ष

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने   मुंबईतील ५५ पोलीस व ४ अधिकारी अशा एकूण ५९, ठाणे शहर १४ व ठाणे ग्रामीण ३ व १ अधिकारी, रायगड २, पुणे शहर ३, नाशिक शहर १ , सोलापूर शहर ३, अमरावती शहर १ wpc,मुंबई रेल्वे ४, नाशिक ग्रामीण ३, जळगाव ग्रामीण २, जालना SRPF १ अधिकारी,

नवी मुंबई  SRPF अधिकारी १, SRPF Gr9 -१, पालघर ग्रामीण २ व १ अधिकारी, ए.टी.एस. १, उस्मानाबाद १, औरंगाबाद शहर ३, जालना १, नवी मुंबई २, सातारा २ , अहमदनगर २, औरंगाबाद रेल्वे १, SRPF अमरावती १, पुणे रेल्वे अधिकारी१, PTS मरोळ अधिकारी १, SID मुंबई १, नागपूर २, बीड १, सोलापूर ग्रामीण १, सांगली १, बुलढाणा १,अशा १२५ पोलिस बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या २८६ पोलीस अधिकारी व २०२९ पोलीस कोरोना  बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


नागरिकांचा सहभाग अपेक्षित

         कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे.  तसेच सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.  सर्वांनी नियम पाळून  सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News