जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने जागर अस्मितेचा मोहिमेचा शुभारंभ - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, August 16, 2020

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने जागर अस्मितेचा मोहिमेचा शुभारंभ

 

नांदेड,१६- उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नांदेड येथे ७४ व्या स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून जागर अस्मितेचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगराणी अंबुलगेकर यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्रांगणात करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा पद्मा नरसारेड्डी सतपलवार, महिला व बाल कल्याण सभापती सुशीलाताई बेटमोगरेकर ,समाजकल्याण सभापती ऍड .रामराव नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, प्रकल्प संचालक तथा अभियान सहसंचालक व्ही. आर. पाटील आदींची उपस्थिती होती.

ग्रामीण भागातील महिला बचत गटाच्या माध्यमातून किशोरवयीन मुली व सर्व साधारण महिला यांना महाराष्ट्र शासनाने  अस्मिता जागर कार्यक्रम अस्मिता प्लस  योजनेतून माफक दरात सॅनिटरी नॅपकिन  उपलब्ध करून देत आहे, सदरील व्यवसायातून महिला बचत गटास रोजगार उपलब्ध होईल आणि महिलांच्या आरोग्यच्या समस्यावर मात करता येईल असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी केले. 


दिनांक १५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत ही मोहीम जिल्ह्यात राबवली जाणार आहे. या प्रसंगी विभाग प्रमुख, कार्यालन अधीक्षक, सहायक कार्यक्रम अधिकारी श्रीमती लव्हारे, गणेश तुंमोड, गणेश कलेटलवार, जिल्हा अभियान व्यवस्थापक गणेश कवडेवार, जिल्हा व्यवस्थापक द्वारकादास राठोड, लेखाधिकारी सुनील कुलकर्णी,  विस्तार अधिकारी गजानन पातेवार, जिल्हा व्यवस्थापक धनंजय भिसे, धनंजय देशपांडे, माधव भिसे, तालुका  व्यवस्थापक प्रा.इरवंत सुर्यकार, स्वप्नील कचवे, राऊत, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे मिलिंद व्यवहारे, देविदास जोंधळे आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News