शिक्षक हा एक विद्यार्थीच ! -रेणुका शेट्टी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, February 28, 2021

शिक्षक हा एक विद्यार्थीच ! -रेणुका शेट्टी

 



मुंबई (सुषेण नरे) : शिक्षक हा ही एक विद्यार्थीच असतो.वर्गांत शिकवण्यासाठी त्यालाही अभ्यास करावाच लागतो त्यामुळेच शिक्षक कधीही निवृत्त होत नसतो तर तो केवळ आपल्या नोकरीतून मुक्त होत असतो असे प्रतिपादन हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी येथील शिक्षिका श्रीमती रेणुका शेट्टी यांनी केले. 

       हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल या निवासी शाळेत गेली तीस वर्षे रेणुका शेट्टी मँडम यांनी अध्ययन अध्यापनाचे कार्य केले याच बरोबर "टँगोर "हाऊसच्या 28 वर्षे गृहपाल म्हणून काम केले. इयत्ता पाचवी ते आठवीचे विद्यार्थी या टंँगोर हाऊस मध्ये राहत असत. या निवासी शाळेत पहिली ते बारावीचे विद्यार्थी राहतात. निवासी शाळा म्हणजे केवळ शालेय शिक्षण नव्हे तर वसतीगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांचे संगोपन करणे, व्यक्तीमत्वाचा विकास घडवून व्यवहार ज्ञान देण्याची जबाबदारीही हाँस्टेल मधील गृहपालांना करावी लागते व ती जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पुर्ण केली यामुळेच विद्यार्थी प्रिय असलेल्या रेणुका मॅडमना मात्र कोरोनाच्या संकटामुळे एक वर्षात प्रत्यक्ष संवाद साधता आला नाही याची खंत निवृत्तीच्या वेळी होती. गेली अनेक वर्षे दहावी वर्गाच्या वर्ग शिक्षिका म्हणून त्या काम पाहत होत्या. विद्यार्थ्यांबरोबरच पालक व इतर सहकारी वर्गाशी सुसंवाद होता. 

          शाळेत विज्ञान प्रमुख म्हणून कार्य करीत असताना अनेक राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार शाळेला प्राप्त करून देणाऱ्या विज्ञान प्रिय शिक्षिका कोरोनाच्या काळातही वेग वेगळे प्रयोग केले व शिक्षण प्रक्रिया चालू ठेवली. आपला विद्यार्थी व शाळा कशी प्रगती करेल हा एकच विचार मनात असलेल्या शिक्षिका सेवेतून निवृत्त झाल्या तरी शिक्षिका म्हणून जीवनातून निवृत्त होत नसतात.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News