निसर्गचक्र पूर्ववत करण्‍यासाठी नागरिकांनी निसर्ग संवर्धनाचा ध्‍यास घ्‍यावा -मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, July 28, 2021

निसर्गचक्र पूर्ववत करण्‍यासाठी नागरिकांनी निसर्ग संवर्धनाचा ध्‍यास घ्‍यावा -मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

 




नांदेड, दि.28 : निसर्गाने दिलेल्या संसाधनांचे संर्वर्धन करुन त्‍याचा जपून वापर करावा. निसर्ग हाच माणसाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा आहे. परंतू आपण आपल्‍या सोईसाठी निसर्गचक्र बिघडवू लागलो आहोत. हे चक्र पून्‍हा पूर्ववत करण्‍यासाठी नागरिकांनी निसर्ग संवर्धनाचा ध्‍यास घ्‍यावा असे आवाहन नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.


     दरवर्षी 28 जुलै रोजी जागतिक निसर्ग संवर्धन दिन साजरा करण्‍यात येतो. त्‍यानिमत्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी ग्रामीण भागातील नागरीकांना निसर्ग संवर्धनाचे आवाहन केले आहे.


     त्‍या म्‍हणाल्‍या, निसर्गाने आपल्‍याला शुध्‍द हवा, पाणी व समृध्‍द वनराई दिली आहे. ही नैसर्गिक साधनसंपत्ती तयार होण्यासाठी हजारो वर्षाचा अवधी लागतो. परंतू माणूस आपल्‍या स्‍वार्थापोटी नैसर्गिक साधन संपत्‍ती संपुष्‍टात आणत आहे. म्‍हणून निसर्गाचा समतोल साधने काळाची गरज आहे. तसेच वने, वन्यजीव, वनांतून मिळणारे पदार्थ, खनिजे आणि खनिज इंधने या मौल्यवान स्रोतांचे जतन होणे आवश्‍यक आहे. यासाठी गावस्‍तरावर निसर्ग संवर्धनासाठी पुढाकार घेण्‍याची आवाहन त्‍यांनी केले आहे.


      कोरोना काळात आपण प्राणवायूची कमतरता अनुभवली आहे. नैसर्गिक प्राणवायूसाठी पारंपारिक वृक्ष लागवड करणे आवश्‍यक असून प्रती व्‍यक्‍ती किमान तीन वृक्ष लावून त्‍याचे संवर्धन करुन निसर्गाची जपणूक करावी असे आवाहन मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News