आरोग्‍य विभागाच्‍या विविध संवर्गाच्‍या 141 बदल्‍या - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, July 28, 2021

आरोग्‍य विभागाच्‍या विविध संवर्गाच्‍या 141 बदल्‍या







नांदेड,दि.28 : नांदेड जिल्‍हा परिषदे अंतर्गत कार्यरत गट-क व गट-ड कर्मचा-यांच्‍या सार्वत्रिक बदली प्रक्रिया समुपदेशनाव्‍दारे सुरु आहेत. मंगळवार दिनांक 27 जुलै रोजी आरोग्य विभागाच्‍या बदली प्रक्रिया संपन्‍न झाल्‍या. या विभागाच्‍या विविध संवर्गाच्‍या 141 बदल्‍या करण्‍यात आल्‍या आहेत.


     जिल्‍हा परिषदेच्‍या कै.यशवंतराव चव्‍हाण सभागृहात संपन्‍न होत असलेल्‍या बदली प्रक्रियेत जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्‍हा परिषद उपाध्‍यक्षा तथा आरोग्‍य सभापती पद्मा नरसारेड्डी सतपलवार, शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर, समाजकल्‍याण सभापती अॅड. रामराव नाईक, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, मुख्‍य लेखा व वित्‍त अधिकारी रावसाहेब कोलगणे, सामान्‍य प्रशासन विभागाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे आदींची उपस्थिती होती.


     जिल्‍हा परिषदेच्‍या आरोग्‍य विभागा अंतर्गत आरोग्‍य सेविका संवर्गातील 69 बदल्‍या झाल्‍या आहेत. यात प्रशासकिय 51 तर विनंती 18 बदल्‍यांचा समावेश आहे. आरोग्‍य सहाय्यीका संवर्गात 6 बदल्‍या करण्‍यात आल्‍या. यात प्रशासकिय 5 तर एक विनंतीवरुन बदली करण्‍यात आली. औषध निर्माण अधिकारी पदाच्‍या एकूण 15 बदल्‍या करण्‍यात आल्‍या. यात प्रशासकिय 10 तर विनंतीवरुन 5 बदल्‍यांचा समावेश आहे. आरोग्‍य सेवक संवर्गात 47 बदल्‍या झाल्‍या यात प्रशासकिय 44 तर विनंतीवरुन 3 बदल्‍या करण्‍यात आल्‍या. विनंतीवरुन विस्‍तार अधिकारी एक व प्रयोग शाळा तंत्रज्ञ संवर्गात एक. आरोग्‍य सहाय्यक पदाच्‍या प्रशासकिय कारणावरुन 2 बदल्‍या करण्‍यात आल्‍या आहेत.


     शासन निर्णयाच्‍या निकषानुसार समुपदेशाने बदली प्रक्रिया पार पाडल्‍या जात आहेत. जिल्‍हयातील सर्व तालुक्‍यात असणा-या जागांच्‍या समानिकरणानुसार पारदर्शक बदल्‍या करण्‍यात येत आहेत. उद्या शुक्रवार दिनांक 30 जुलै रोजी अर्थ विभाग, शिक्षण विभाग व सामान्‍य प्रशासन विभागातील कर्मचा-यांच्‍या बदल्‍या करण्‍यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News