*महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, November 3, 2021

*महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे*


नांदेड दि. 3  (जिमाका) :- जिल्ह्यात महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती 2019 योजनेंर्तगत 197 खातेदारांनी आधार प्रमाणिकरण केलेले नाही. त्यांनी आधार प्रमाणिकरण केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात शासनामार्फत कर्जमुक्ती योजनेची रक्कम जमा करता येणार नाही. यासाठी 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेबर 2021 या कालावधी पासून जिल्हास्तरावर आधार प्रमाणिकणासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती उपनिबंधक सहकारी संस्थेच्या उपनिबंधक डॉ.शुभांगी  गोंड यांनी पत्रकाव्दारे दिली आहे. 

 

नांदेड तालुक्यात सदर योजनेंतर्गत 6519 पात्र कर्जखात्यांच्या याद्या विशिष्ट क्रमांकासह प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी 6322 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केलेले असून 197 खातेदारांचे आधार प्रमाणिकरण होणे बाकी आहेत. या योजनेतील 197 पात्र कर्ज खात्यांना विशिष्ट क्रमांक प्राप्त असतानाही संबंधित लाभार्थ्यांनी अद्याप आधार प्रमाणिकरण झाले नसल्याने त्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेला नाही. आधार प्रमाणिकरण व तक्रार निराकरण टप्यावरील प्रलंबित कामकाज विशेष मोहिमेव्दारे पूर्ण करण्याच्या सूचना प्रधान सचिव (सहकार) सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.

विशेष मोहिमे अंतर्गत आधार प्रमाणिकरण करणे बंधनकारक असून आधार प्रमाणिकरणासाठी ही अंतिम संधी आहे. नांदेड तालुक्यातील उर्वरित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणिकरण करून  घ्यावे असे आवाहन उपनिबंधक सहकारी संस्था यांच्यावतीने करण्यात आले आहे.



No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News