राष्ट्रनिर्मात्यांच्या जीवनावर तामगाडगे गुरूजींनी 'क्रांतीसूर्य' व 'रमा' ही नाटकं लिहिण्याचं धाडस यशस्वीपणे केलं -ज्येष्ठ समिक्षक प्रा. डॉ. प्रकाश मोगले # तामगाडगे गुरूजींची 'क्रांतीसूर्य ' व 'रमा' ही नाटकं ; महासूर्य महानायकांच्या जीवन कार्याची प्रभावी सचित्र मांडणी -प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर #तामगाडगे गुरूजींची 'क्रांतीसूर्य ' व 'रमा' ही नाटकं समाज प्रबोधनाचं उत्तम साधन -प्राचार्या शुभांगीताई ठमके * आयुष्मान तामगाडगे गुरूजींच्या 'क्रांतीसूर्य ' व 'रमा' नाट्य ग्रंथाचा प्रकाशन सोहळा - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, December 27, 2021

राष्ट्रनिर्मात्यांच्या जीवनावर तामगाडगे गुरूजींनी 'क्रांतीसूर्य' व 'रमा' ही नाटकं लिहिण्याचं धाडस यशस्वीपणे केलं -ज्येष्ठ समिक्षक प्रा. डॉ. प्रकाश मोगले # तामगाडगे गुरूजींची 'क्रांतीसूर्य ' व 'रमा' ही नाटकं ; महासूर्य महानायकांच्या जीवन कार्याची प्रभावी सचित्र मांडणी -प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर #तामगाडगे गुरूजींची 'क्रांतीसूर्य ' व 'रमा' ही नाटकं समाज प्रबोधनाचं उत्तम साधन -प्राचार्या शुभांगीताई ठमके * आयुष्मान तामगाडगे गुरूजींच्या 'क्रांतीसूर्य ' व 'रमा' नाट्य ग्रंथाचा प्रकाशन सोहळा


राष्ट्रनिर्मात्यांच्या जीवनावर तामगाडगे गुरूजींनी 'क्रांतीसूर्य' व 'रमा' ही नाटकं लिहिण्याचं धाडस यशस्वीपणे केलं  

-ज्येष्ठ समिक्षक प्रा. डॉ. प्रकाश मोगले


# तामगाडगे गुरूजींची 'क्रांतीसूर्य ' व 'रमा' ही नाटकं ; महासूर्य महानायकांच्या जीवन कार्याची प्रभावी सचित्र मांडणी 

-प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर


#तामगाडगे गुरूजींची 'क्रांतीसूर्य ' व 'रमा' ही नाटकं समाज प्रबोधनाचं उत्तम साधन -प्राचार्या शुभांगीताई ठमके

* आयुष्मान तामगाडगे गुरूजींच्या 'क्रांतीसूर्य ' व 'रमा' नाट्य ग्रंथाचा प्रकाशन सोहळा


किनवट : तामगाडगे गुरुजींच्या रंगभूमी क्षेत्रातील कामगिरीची दखल घेतल्याशिवाय किनवटचा सांस्कृतिक इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. नाट्यलेखनाने समाजातील प्रश्न सुटायला मदत झाली पाहिजे, यासाठी त्यांनी आयुष्यभर लेखणी झीजवली. त्यांच्या लिखाणाचा हेतू समाजप्रबोधन होते. प्रेक्षकापर्यंत संदेश पोहोचवणे महत्त्वाचे असते. भाषण प्रवचनापेक्षा नाट्य प्रयोगातून दिला जाणारा बुद्धांचा धम्मविषयक विचार अधिक खोलवर प्रेक्षकांच्या मनात रुजणारा आहे. महात्मा फुले-सावित्रीबाई व डॉ. बाबासाहेब आंबेडकर- रमाई यांच्या त्यागावर राष्ट्राची उभारणी झालेली आहे. याच खऱ्या राष्ट्रनिर्मात्यांच्या जीवनावर तामगाडगे गुरूजींनी 'क्रांतीसूर्य' व 'रमा' ही नाटकं लिहिण्याचं धाडस यशस्वीपणे केलं आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ समिक्षक प्रा. डॉ. प्रकाश मोगले यांनी केले.

         येथून जवळच असलेल्या गोकुंदा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या मातोश्री कमलताई ठमके सभागृहात आयोजित यादव तामगाडगे गुरुजी लिखित "क्रांतीसूर्य" व " रमा" या नाट्यग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके अध्यक्षस्थानी होते.  कौशल्य प्रकाशनचे प्रकाशक डॉ. अशोक गायकवाड, ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. प्रकाश मोगले , समाज व माध्यम क्षेत्राचे अभ्यासक प्रा.डॉ. राजेंद्र गोणारकर, रामजी कांबळे, प्राचार्या शुभांगीताई ठमके हे प्रमुख अतिथी , नाटककार यादव तामगाडगे गुरुजी व त्यांच्या पत्नी शांताबाई तामगाडगे मंचावर उपस्थित होते.



   पुढे बोलताना प्रा. डॉ. मोगले असे म्हणाले की,महात्मा फुले त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर c त्यांच्या पत्नी रमाबाई यांच्या जीवन कार्यावर , त्यागावर या राष्ट्राची उभारणी झालेली आहे. हेच खरे राष्ट्रनिर्माते आहेत. महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित "क्रांतीसूर्य" हे नाटक लिहिण्याचा यशस्वीपणे प्रयत्न त्यांनी केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या जीवनावर आधारित "रमा " हे नाटक लिहिण्याचे धाडस त्यांनी केले आहे. नाटक हा सर्वात अवघड असलेला वांङमयय प्रकार. नाटक ही सामूहिक कृती असते. म्हणून ती समूहाला आवाहन करीत असते. एकाच वेळी भिन्न भिन्न प्रकृतीच्या माणसांना आकर्षित करणे , त्यांचे समाधान करणे , अत्यंत अवघड बाब असते. पण तामगाडगे गुरुजींनी लिहिलेली नाट्यसंहिता आणि नाट्यप्रयोग प्रयोग करणाऱ्या कलावंतांनी आणि तंत्रज्ञांनी हे अवघड आव्हान लीलया पेलले आहे .

     राजा तामगाडगे यांनी प्रास्ताविक केले. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. रमेश मुनेश्वर यांनी आभार मानले. प्रारंभी वामनदादा कर्डक संगीत अकादमीच्या वतीने सुरेश पाटील , प्रज्ञाचक्षू संगीतकार अनिल उमरे, आम्रपाली वाठोरे , रुपेश मुनेश्वर यांनी व्यंकट मुंडावरे (तबला) व साहेबराव वाढवे (ढोलकी ) यांच्या साथीने गीते प्रबोधनाची सादर केली.

       यादव तामगाडगे गुरुजी लिखित " क्रांतीसूर्य" व " रमा" या नाट्यग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाल्यानंतर संपादक साजिद बडगुजर यांच्या सा. लोकादेशच्या प्रकाशन सोहळा विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.



         क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले विचार मंचच्या अध्यक्षा प्राचार्या शुभांगीताई ठमके म्हणाल्या की, साहित्याची समाजाला गरज आहे. आदिकाळापासूनचं साहित्य नसतं तर आम्ही घडलो नसतो. नाटक हे ऑडिओ व्हिज्युएल माध्यम आहे. ते प्रभावीपणे माणसाच्या मनात घर करतं. तामगाडगे गुरूजींची 'क्रांतीसूर्य व रमा ही नाटकं समाज प्रबोधनाचं उत्तम साधन आहेत.



          यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे संस्कृती व माध्यम अभ्यासक प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर म्हणाले,तामगाडगे गुरुजी किनवटच्या दुर्गम क्षेत्रात गेली चार दशकं नाटकं सादर करतात. ही अत्यंत समाधानाची बाब आहे. साहित्य क्रांती करते का ? तर नाही. साहित्य क्रांती करण्याची मानसिकता तयार करतं. अशाच प्रकारे अदिवासी दुर्गम भागातील दुःख जगासमोर मांडणाऱ्या यादव तामगाडगे गुरुजी यांची नाट्यसंहिता आज पुस्तक रुपानं साकारली आहे. ही अत्यंत चांगली बाब आहे. तामगाडगे गुरूजींची 'क्रांतीसूर्य ' व 'रमा' ही नाटकं क्रांति घडविणाऱ्या महासूर्य महानायकांच्या जीवन कार्याला प्रभावीपणे सचित्र मांडणारी प्रभावी साधनं आहेत. 



याप्रसंगी अखिल भारतीय बौद्ध उपासक संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा कौशल्य प्रकाशन औरंगाबादचे प्रकाशक डॉ. अशोक गायकवाड यांनी आपले प्रकाशकीय मनोगत व्यक्त केले.

          या औचित्याने नाट्यप्रयोगात प्रमुख भूमिका साकारलेल्या डॉ. विजय कांबळे, कचरू चौधरी, रमेश मुनेश्वर , शब्दांजली कानिंदे- शिंदे, रूपेश मुनेश्वर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्रा. रामप्रसाद तौर , संपादक नंदकुमार कांबळे, काशीनाथ भवरे, शंकर भातनासे, रमेश चौधरी, सखाराम घुले, प्रा. गजानन सोनोने, ऍड. मिलिंद सर्पे, उद्धव रामतिर्थकर , प्रभाकर बोड्डेवार, सुमनताई साबळे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

         कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. पंजाब शेरे, महेंद्र नरवाडे, अनित्य कांबळे, शंकर तामगाडगे, माया तामगाडगे- कांबळे, राजा तामगाडगे, राहूल तामगाडगे, कपिल भवरे, आनंद गिमेकर , आशा तामगाडगे , पुण्यरथा उमरे- तामगाडगे, भीमज्योत मुनेश्वर , शीलरत्न पाटील आदिंनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News