नांदेडच्या लताताई उमरेकरला ब्राझील पॅरा ( दिव्यांग ) बॅडमिंटन अंतरराष्ट्रीय स्पर्धेत कास्य पदक - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, May 7, 2022

नांदेडच्या लताताई उमरेकरला ब्राझील पॅरा ( दिव्यांग ) बॅडमिंटन अंतरराष्ट्रीय स्पर्धेत कास्य पदक

  




नांदेड: जिल्ह्याची पॅरा ( दिव्यांग ) शटलर खेळाडू लताताई परमेश्वर उमरेकर हिने ब्राझील येथे झालेल्या पॅरा ( दिव्यांग ) बॅडमिंटन अंतरराष्ट्रीय स्पर्धेत महिला दुहेरीत कास्य पदक प्राप्त केले आहे. या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.

         या स्पर्धेत लताताई आणि नित्यश्री या भारतीय महिला जोडीने ब्राझीलच्या नतालिया व क्रिस्टीना या जोडीचा 21-15 , 21-06 , असा सरळ सेटने पराभव करून कास्य पदकावर आपले नाव कोरले आहे. या स्पर्धा विविध दिव्यांग प्रकारात पार पडल्या असून या स्पर्धेत विविध देशातील जवळपास 300 पेक्षा अधिक दिव्यांग खेळाडूंनी सहभाग घेतला होता . भारताने या स्पर्धेत 28 पदके मिळवली असून त्या मध्ये 9 सुवर्ण 6 रोप्य आणि 13 कास्य पदके याचा समावेश आहे. भारताचे प्रशिक्षक द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त गोरव खन्ना  यांच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमने कमाल केली आहे . 

      लताताईने आता पर्यंत अनेक राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पाच पदके प्राप्त केली असून तिने पहिल्यांदाच भारताकडून ब्राझील पॅरा ( दिव्यांग ) बॅडमिंटन अंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला असून या संधीचे तिने सोने केले आहे , आपली आर्थिक परिस्थिती बिकट व कमकुवत  असतानाही तिने खेळावर लक्ष केंद्रीत केले. आपण दिव्यांग आहोत म्हणून ती रडगाणं गात बसली नाही. मानवी जीवन जगत असताना जीवनावरच न्हवे तर मानसिक आणि शारीरिक दिव्यांगावर मात करण्याचे समाजामध्ये फार कमी प्रमाण आहे. परंतु या स्थितीतही तिने मिळवलेलं यश प्रशंसनीय आहे . तिचा यापुढील प्रवास खूप खडतर प राहणार आहे . कारण आतापर्यंत कमी खर्चात सर्व काही झाले आहे पण आता फार मोठी जिम्मेदारी पडली आहे . ती म्हणजे आगामी एशियन गेम्स आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी पदके मिळवायची. या साठी खूप मोठा खर्च लागणार असून तिला आर्थिक मदतीची गरज आहे .  काही प्रमाणामध्ये परिवार आणि IIB PCB टीम ने आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. तिच्या ब्राझील येथील स्पर्धेचा खर्च उचललेला असून अशाच पुढील स्पर्धेचा पण खर्च समाजातील दानशूर व्यक्तींनी उचलावा जेणे करून तिच्या स्वप्नांना बळ आणि तिच्या मेहनतीला फळ मिळेल आणि ती देशासाठी पदके प्राप्त करू शकेल . 


         तिच्या या यशाबद्दल नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ . विपिन इटनकर, नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी  वर्षा ठाकूर- घुगे, नांदेड- आणि वाघाळा मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने , समाजकल्याण अधिकारी एडके  लातूर विभागीय क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे , अमरावती विभाग उपसंचालक नांदेड जिल्हाचे सुपुत्र विजय संतान , जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश मारावार , क्रीडा अधिकारी किशोर पाठक , गुरुदीपसिंह संधू , लताताईचे कोच किरण माने , चेतन माने , बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव महेश, प्रलोभ कुलकर्णी , IIB PCB चे MD दशरथ पाटील  ( MD नांदेड - लातूर पुणे ) , अकॅडमी डायरेक्टर महेश पाटील , सिनिअर को - ऑर्डिनेटर शेख सादिक , चीफ अडवाइजर बालाजी कदम , डायरेक्टर नरेश भोसले , PCB डायरेक्टर बालाजी वाकोडे , मनेजमंट को ऑर्डिनेटर विराज पाटील , IT सिस्टीम मनेजर अक्षय नळदकर व संपूर्ण IIB PCB टीम ने तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News